Join us  

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत ' हा ' भारताचा खेळाडू खेळणार नाही

अफगाणिस्तानविरुद्धच्या भारताचा कर्णधार विराट कोहली खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण त्यानंतर भारताचा अजून एक खेळाडू खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 2:03 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचा ' हा ' खेळाडू खेळणार नसेल तर त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात येऊ शकते.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा एक कसोटी सामना 14 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण त्यानंतर भारताचा अजून एक खेळाडू खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

आयपीएलच्या अकराव्या हंगामात भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा जायबंदी झाला आहे. आयपीएलमध्ये साहा सनरायझर्स हैदराबाद या संघातून खेळत होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात साहाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला खेळता आले नाही. पण साहा या सामन्यात खेळणार नसले तर त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात येऊ शकते.

साहाच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने सांगितले की , " कोलकाताविरुद्धच्या सामन्यात साहाच्या अंगठ्यासा दुखापत झाली होती. त्यामुळे साहाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळता आले नव्हते. सध्याच्या घडीला साहावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्याची दुखापत किती गंभीर आहे हे पाहिले जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. "

टॅग्स :वृद्धिमान साहाविराट कोहलीक्रिकेट