माऊंट माऊंगानुई : भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या दुसºया वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्यास उत्सुक आहे. कामगिरीत सातत्य राखत भारतीय महिला संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये आपली स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भारतीय महिला संघाने मैदानाबाहेरचे वाद विसरून तीन सामन्यांच्या मालिकेची शानदार सुरुवात केली आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिप मालिकेच्या पहिल्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा ९ गडी राखून पराभव केला. मालिकेपूर्वी भारतीय महिला संघ वन-डे कर्णधार मिताली राज व तत्कालीन प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यादरम्यानच्या मतभेदांमुळे वादात सापडली होती. त्यानंतर पोवार यांना बाहेरचा मार्ग दाखवित डब्ल्यू. व्ही. रमण यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. पहिल्या सामन्यात भारतातर्फे एकता बिष्ट व पूनम यादव यांनी प्रत्येकी तीन, तर दीप्ती शर्माने दोन बळी घेतले. न्यूझीलंड संघ ४८.४ षटकांत १९२ धावांत गारद झाला. त्यानंतर स्मृती मानधना व जेमिमा रोड्रिग्ज यांनी १९० धावांची भागीदारी करीत भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाचे लक्ष्य दुसºया वन-डेसह मालिका विजयाचे आहे. २०१४ ते २०१६ या कालावधीत आयसीसी महिला चॅम्पियनशिप मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध १-२ ने पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. दुसºया बाजूचा विचार करता न्यूझीलंड संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिप तालिकेमध्ये दुसºया स्थानी आहे. यजमान असल्यामुळे त्यांना विश्वकप स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल. पहिल्या लढतीत न्यूझीलंड संघ तिन्ही विभागांमध्ये भारताच्या तुलनेत कमकुवत भासला. सामन्यानंतर बोलताना सॅटर्थवेट म्हणाली, ‘आम्हाला अधिक आत्मविश्वासाने खेळावे लागेल.’ (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), तान्या भाटिया, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, डायलन हेमलता, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम राऊत, जेमिमा रोड्रिगेज, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव.
न्यूझीलंड : एमी सेटरवेट, सुजी बेट््स, बर्नाडिन बेजिडेनहोट, सोफी डेवाईन, लारेन डाऊन, मॅडी ग्रीन, होली हडलटन, लेघ कास्परेक, एमेलिया केर, केटी पर्किन्स, एना पेटरसन, हना रोव व लिया ताहुहू.
Web Title: Indian women are eager to win the series; Second match against New Zealand today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.