Team India former coach क्रिकेट विश्वात खळबळ माजवणारी एक घटना समोर आली आहे. भारतीय महिला संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठेच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे. त्याच्या घरातून एक कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. २ मार्चला वडोदरा पोलिसांनी तुषार आरोठेच्या घरावर छापा टाकला होता. पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपला (एसओजी) याबाबत गुप्त माहिती मिळाल्याची अधिकृत निवेदनात पुष्टी करण्यात आली. त्यानंतर प्रतापगंज भागातील तुषारच्या घरावर छापा टाकण्यात आला.
SOG ने काय दिली माहिती?
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, तुषारच्या घरावर टाकलेल्या छाप्यात १.१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तुषारचा मुलगा ऋषी याच्या अपार्टमेंटमधून रोख रकमेची बॅग आली होती. ऋषीवर यापूर्वी बेटिंग आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. विक्रांत रायपतवार आणि अमित जनित नावाच्या अन्य दोन सदस्यांकडून ३८ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
याआधीही खाल्ली तुरुंगाची हवा
तुषारला पोलिसांनी पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०१९ मध्ये पोलिसांनी त्याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक केली होती. आयपीएलमध्ये सट्टेबाजी करताना बडोदा पोलीसांनी त्याला अटक केली होती. यावेळी त्याच्यासोबत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच काही मोबाईल आणि वाहनेही जप्त करण्यात आली होती. नंतर न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केला.
आता मुलगाही पोलिसांच्या रडारवर
आता तुषार अरोठेसोबतच छापा प्रकरणी त्याचा मुलगा ऋषी अरोठे याचेही नाव समोर आले आहे. रोख रकमेबाबत तुषारने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत, असेही सांगण्यात येत आहे. तुषारचा मुलगा ऋषी सुद्धा रणजी खेळला आहे, त्याच्यावर अनेक आरोप झाले आहेत.
Web Title: Indian women cricket team former coach Tushar Arothe house raid by Vadodara police seize Rs 1 crore cash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.