Indian Cricketer death: भारतीय महिला क्रिकेटरचा मृत्यू, झाडाला लटकलेला सापडला मृतदेह

मृत क्रिकेटपटूच्या आईने प्रशिक्षकावर केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 06:23 PM2023-01-13T18:23:34+5:302023-01-13T18:24:11+5:30

whatsapp join usJoin us
Indian women cricketer Rajashree Swain found hanging from tree death case | Indian Cricketer death: भारतीय महिला क्रिकेटरचा मृत्यू, झाडाला लटकलेला सापडला मृतदेह

Indian Cricketer death: भारतीय महिला क्रिकेटरचा मृत्यू, झाडाला लटकलेला सापडला मृतदेह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Cricketer death: भारतीय महिला क्रिकेटपटू राजश्री गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होती. पोलिसांनी तिचा तपास केला असता तिच्या मोबाईल नेटवर्कचे शेवटचे लोकेशन कुठे आहे याच्या मदतीने राजश्रीच्या मृतदेहापर्यंत पोहोचले. भारतीय महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. ओडिशाची महिला क्रिकेटर राजश्री हिचा मृतदेह गुरुडिझहटिया जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. राजश्रीच्या कुटुंबीयांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशन आणि महिला संघाच्या प्रशिक्षकावर आरोप केले आहेत.

22 वर्षीय राजश्री अचानक बेपत्ता झाली आणि शुक्रवारी तिचा मृतदेह सापडला. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना यापूर्वी पुरी येथील राजश्रीची स्कूटर आणि हेल्मेट सापडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात राजश्रीचा मोबाईल बंद होता. शेवटच्या मोबाईल नेटवर्क लोकेशनवरून पोलीस तेथे पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

राजश्रीबद्दल असोसिएशनने ती बेपत्ता असल्याची नोंद केली होती. ओडिशा टीव्हीच्या वृत्तानुसार, राजश्री क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात भाग घेतलेल्या २५ सदस्यीय संघाचा भाग होती, परंतु अंतिम संघात स्थान मिळवू न शकल्यामुळे ती तणावाखाली होती आणि जानेवारीपासून ती दिसली नाही. एका वाहिनीशी बोलताना राजश्रीच्या आईने सांगितले की, तिची मुलगी सिलेक्शन कॅम्पसाठी कटक येथे आली होती आणि एका हॉटेलमध्ये थांबली होती. १० दिवसांच्या शिबिरानंतर, त्यांची मुलगी सर्वोत्तम खेळाडू असतानाही तिला जाणूनबुजून अंतिम संघातून वगळण्यात आले. तेव्हापासून त्यांची मुलगी तणावात होती आणि तिने बहिणीलाही फोन केला होता.

राजश्रीच्या आईने असोसिएशनवर आरोप केला आहे की त्यांनी तिची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती यापूर्वी दिली नाही. शिबिर आयोजकांनीही त्यांना सांगितले नाही. त्यांनी स्वतः संपर्क साधला तेव्हा आयोजकांनी सांगितले की त्यांची मुलगी बेपत्ता आहे.

Web Title: Indian women cricketer Rajashree Swain found hanging from tree death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.