नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेमध्ये भारताच्या एका क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंसाठी विचारणा करण्यात आली होती. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सोमवारी याबाबतची माहिती दिली. सोमवारी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने या दोन व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख अजित सिंह शेखावत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शेखावत यांनी याबाबत सांगितले की, " आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या प्रकरणाचा तपास करत आहे. भारताच्या या क्रिकेटपटूने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला ही माहिती दिली. त्यामुळे आता या गोष्टीचा तपास योग्यरीतीने होत आहे. या खेळाडूने ही माहिती देून चांगलेच काम केले आहे."
बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलीसांची मदत मागितली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलीसांना राकेश बाफना आणि जितेंद्र कोठारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगितली आहे. भारतीय महिला संघातील एका क्रिकेटपटूने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला ही माहिती दिली आहे.