भारतीय महिला आॅसी आव्हानासाठी सज्ज

दक्षिण आफ्रिकेविरोधातील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेला भारतीय महिला क्रिकेट संघ सोमवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:39 AM2018-03-12T01:39:49+5:302018-03-12T01:39:49+5:30

whatsapp join usJoin us
 Indian women ready to face challenge | भारतीय महिला आॅसी आव्हानासाठी सज्ज

भारतीय महिला आॅसी आव्हानासाठी सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वडोदरा : दक्षिण आफ्रिकेविरोधातील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेला भारतीय महिला क्रिकेट संघ सोमवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळेल.
तीन सामन्यांची ही मालिका आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग आहे. आॅस्ट्रेलियाची फलंदाजी खूपच मजबूत आहे. ज्यात कर्णधार लेग मॅनिन, अष्टपैलू एलिस पेरी, एलिस वेलानी आणि यष्टिरक्षक अलीसा हिली यांचा समावेश आहे.
याआधी दोन्ही संघात झालेल्या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या धमाकेदार खेळीने भारताला विजयी केले होते. विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीतने १७१ धावांची खेळी करत विजय मिळवून दिलेला.
हरमनप्रीत म्हणाली की, ‘पहिल्या सामन्यासाठी रणनीती बनवू शकत नाही. त्यांच्याकडे पेरी, लॅनिंग आणि
वेलानी या सारखे चांगलेच फलंदाज आहेत. आम्हाला लय बनवावी लागेल. मधल्या फळीत आम्ही मागे पडतो. आम्ही त्यावर काम करत आहोत.’ भारतीय फलंदाजी हरमनप्रीत व कर्णधार मिताली राज यांच्यावर टिकून आहेत. जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी दुखापतीमुळे खेळणार नाही. तिच्या अनुपस्थितीत शिखा पांडे व पूजा वस्त्राकार गोलंदाजीची धुरा वाहतील.

Web Title:  Indian women ready to face challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.