वेलिंग्टन : अखेरच्या वन-डेमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलामी लढतीत शानदार कामगिरीसह विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे.तीन सामन्यांची मालिका महिला वन-डे चॅम्पियनशिपचा भाग होती. त्यात भारताने २-१ ने विजय मिळवला. पण हॅमिल्टनमध्ये १ फेब्रुवारीला अखेरच्या सामन्यात ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.वन-डेमध्ये मिताली राज कर्णधार होती तर आता हरमनप्रीत कौर नेतृत्व करेल. इंग्लंडमध्ये टी-२० विश्वकप उपांत्य लढतीत इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, भारताचा हा पहिला टी-२० सामना आहे. त्या लढतीत मितालीला वगळण्यात आले होते. टी-२० क्रिकेटमध्ये मितालीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित झाले होते. आता २०० वन-डे खेळणारी ही अनुभवी खेळाडू टी-२० मध्ये कशी कामगिरी करते, याबाबत उत्सुकता आहे. तिसऱ्या वन-डेमध्ये भारतीय फलंदाजांवर फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले होते. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजीमध्ये हरमनप्रीत कौरवर मोठी भिस्त राहणार आहे, तर स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिगेज यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची आशा आहे.प्रतिस्पर्धी संघभारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिष्ट, डायलान हेमलता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, प्रिया पुनिया.न्यूझीलँड : एमी सॅटर्थवेट (कर्णधार), सुजी बेट्स, बर्नाडाईन बी, सोफी डेवाईन, हिली जेन्सन, कॅटलिन गुरी, ले कास्पेरेक, अमेलिया केर, फ्रान्सिस मॅके, केटे मार्टिन, रोसमरी मायर, हन्ना रोव, लिया ताहूहू.सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी ८.३० पासून.मिताली होणार टी-२० तून निवृत्त?नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू मिताली राज भारतात होणाºया इंग्लंडविरुद्धच्या दौºयानंतर टी-२० प्रकारातून निवृत्त होऊ शकते. मात्र एकदिवसीय सामन्यात ती खेळत राहणार आहे.बीसीसीआयच्या अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत विश्वचषकाची तयारी करत आहे. या स्पर्धेत ती खेळू शकनार नाही हे मितालीला माहित आहे.’संबंधित अधिकारी म्हणाला, ‘मितालीसारख्या खेळाडूची निवृत्तीही शानदार असायला हवी. ही संधी इंग्लंडच्या भारत दौºयात मिळूशकते.’ न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी-२० सामन्यात मितालीला सर्वच सामन्यात संघात स्थान मिळण्याची शक्यता नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय महिला संघ विजयासाठी उत्सुक
भारतीय महिला संघ विजयासाठी उत्सुक
अखेरच्या वन-डेमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलामी लढतीत शानदार कामगिरीसह विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 5:07 AM