भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील सामने एकतर्फी झाले नसले तरी कसोटी मालिकेत टीम इंडियाचा दबदबा दिसला. पहिल्या कसोटीत भारतानं डावाच्या फरकानं बांगलादेश संघाला लोळवलं आणि दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या महिला संघानंही वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभवाचे धक्के देण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. विंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघांने चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यांत 50 धावा केल्या आणि तरीही अवघ्या पाच धावांनी थरराक विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 9 षटकांचा खेळवण्यात आला. यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 7 बाद 50 धावा केल्या. भारताच्या एकाच फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या. पूजा वस्त्राकरनं 10 धावा केल्या. विंडीजच्या हेली मॅथ्यूजनं 13 धावांत तीन विकेट्स घेतल्या. अॅफी फ्लेचर आणि शेनेटा ग्रिमोंड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात मॅथ्यूज (11), सिनेले हेन्री (11) आणि नताशा मॅकलीन ( 10) यांनी दमदार खेळी केली. भारताकडून अनुजा पाटीलनं 8 धावांत 2 विकेट्स घेतल्या. विंडीजला विजयासाठी अखेरच्या षटकात 13 धावा हव्या होत्या, अनुजानं अचूक मारा करताना केवळ 7 धावा दिल्या आणि भारतीय महिलांनी 5 धावांनी विजय मिळवला.
Web Title: Indian Women won by 5 runs beat West Indies Women in 4th T20; take 4-0 lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.