Join us  

Smriti Mandhana: "खूप गोष्टी बदलतील...", हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाने सांगितले महिला IPLमुळे होणारे फायदे

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांसारख्या स्टार खेळाडूंनी महिला आयपीएलबाबत भाष्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 8:24 PM

Open in App

नवी दिल्ली : हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांसारख्या स्टार खेळाडूंनी महिला आयपीएलबाबत भाष्य केले आहे. महिला आयपीएल नवीन खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्यास मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी मार्चमध्ये पहिल्या महिला आयपीएलच्या हंगामाचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत आणि सलामीवीर स्मृती मानधना यांच्यासह देशातील नामांकित खेळाडूंशिवाय विदेशी महिला स्टार खेळाडू देखील यात सहभागी होणार आहेत.

महिला खेळाडू आयपीएल खेळल्या तर...स्टार स्पोर्ट्स शो 'फॉलो द ब्लूज' मध्ये हरमनप्रीत कौरने म्हटले, "आयपीएल त्या खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ असेल, जे चांगली खेळी करतात. आपल्या सर्वांना माहित आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वांचा दृष्टिकोन आणि मानसिकता एका रात्रीत बदलू शकत नाही. पण आयपीएलमध्ये जेव्हा विदेशी खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल तेव्हा एक व्यासपीठ मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे काय ते समजेल." याशिवाय जेव्हा आयपीएलमध्ये खेळणारी युवा खेळाडू भारतीय संघासाठी खेळते तेव्हा तिच्यावर कोणतेही अतिरिक्त दडपण नसते कारण आजकाल जे खेळाडू देशांतर्गत संघातून निवडले जातात, मला कधीकधी असे दिसते की त्यांना त्यांची रणनीती कशी बदलावी हेच कळत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी ही स्पर्धा मोठी भूमिका बजावेल. त्यामुळे येत्या काही वर्षांत मुली जेव्हा आयपीएलमध्ये खेळतील तेव्हा त्यांच्या कामगिरीत मोठा बदल पाहायला मिळेल. अशा शब्दांत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आयपीएलबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले. 

देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यांना होणार फायदा भारतीय महिला संघाने मागील वर्षभरात शानदार कामगिरी केली आहे. संघाने वनडे आंतरराष्ट्रीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय आणि वनडे आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. तर इंग्लंडला 3-0 असा ऐतिहासिक क्लीन स्वीप केले. लक्षणीय बाब म्हणजे संघाने विक्रमी सातव्यांदा आशिया कप जिंकला. मराठमोळ्या स्मृतीने महिला आयपीएलची तुलना 'द हंड्रेड' आणि महिला 'बिग बॅश लीग' यांसारख्या लीगशी केली. या लीगचा तिथल्या देशांतर्गत खेळाडूंना कसा फायदा झाला याबद्दल मानधनाने म्हटले, "महिला क्रिकेटबद्दल बोलताना आम्ही विचार करतो की याचा कशा पद्धतीने पाया मजबूत होईल. पण वस्तुस्थिती अशी आहे की याचा देशांतर्गत क्रिकेटपटूंना खूप फायदा होईल कारण अशा लीगमध्ये खेळण्याचा अनुभव महिला क्रिकेटमध्ये बरेच काही आणेल. आम्ही पाहिले आहे की बिग बॅश आणि द हंड्रेडचा अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या देशांतर्गत खेळाडूंना कसा फायदा झाला आहे."

महिला क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी बदलतीलस्मृती मानधनाने आणखी सांगितले, "म्हणून मला खरोखर आनंद आहे की भारतीय संघाच्या महिला खेळाडूंना आयपीएलचा खूप फायदा होईल. याचा फायदा देशांतर्गत स्तरावर खेळणाऱ्या मुलींनाही होईल. महिला आयपीएल भारतातील खेळाला एका नव्या उंचीवर नेईल, असे फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जने सांगितले. महिला आयपीएलमुळे भारतातील महिला क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी बदलतील, असेही तिने म्हटले. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघस्मृती मानधनाआयपीएल २०२२बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App