IPL पेक्षा महिला प्रीमिअर लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक होता - हरमनप्रीत कौर

महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने किताब उंचावला.

By ओमकार संकपाळ | Published: August 15, 2023 08:22 PM2023-08-15T20:22:28+5:302023-08-15T20:23:01+5:30

whatsapp join usJoin us
 Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur says audience response to Women's Premier League was greater than IPL  | IPL पेक्षा महिला प्रीमिअर लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक होता - हरमनप्रीत कौर

IPL पेक्षा महिला प्रीमिअर लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक होता - हरमनप्रीत कौर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग (WPL) ही भारतातील महिला क्रिकेटला कलाटणी देणारी घटना असल्याचे म्हटले आहे. महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने किताब उंचावला. सध्या 'द हंड्रेड' स्पर्धेत व्यग्र असलेल्या हरमनने एका कार्यक्रमात बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. इंडियन प्रीमियर लीगपेक्षा (IPL) महिला प्रीमिअर लीगला (WPL) प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद होता, असे हरमनने नमूद केले. 

"WPL ही स्पर्धा आमच्यासाठी गेम चेंजर होती. पहिला हंगाम खूप चांगला गेला. घरी परतल्यानंतर सगळ्यांना ते आवडलं. आम्हाला मिळालेला प्रतिसाद अविस्मरणीय होता. खरं सांगायचं झालं तर, काही प्रेक्षकांना पुरूषांच्या आयपीएलच्या तुलनेत महिलांच्या आयपीएलमध्ये अधिक रस होता. कारण सर्वांना पाहण्यासाठी काहीतरी नवीन होते", असे हरमनप्रीतने डॅगर्स अँड लिड्स पॉडकास्टवर सांगितले. महिला प्रीमिअर लीगचा पहिला हंगाम ४ मार्च ते २६ मार्च यादरम्यान मुंबईत पार पडला. या लीगच्या पदार्पणाच्या हंगामात एकूण पाच संघ सहभागी होते आणि २२ सामने खेळवले गेले. सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील येथे झाले. 

WPL मध्ये भविष्यात संघ वाढतील अशी आशा आहे - हरमन 
तसेच महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मला आशा आहे की, भविष्यात आमच्यासोबत आणखी संघ असतील. आपल्या देशात खूप चांगली प्रतिभा आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. त्या मुलींना ही संधी मिळाली पाहिजे, ज्या यासाठी खूप मेहनत घेत आहेत, असेही भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले. 

मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत उद्घाटनाच्या हंगामात चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. विजेत्या संघाला WPL २०२३ ट्रॉफीसह सहा कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळाले, तर उपविजेत्या संघाला तीन कोटी रुपये मिळाले. हरमनप्रीतने भारताबाहेर फ्रँचायझी टूर्नामेंट खेळण्याच्या तिच्या अनुभवाबद्दल देखील खुलासा केला. "पहिल्यांदा महिला बिग बॅश लीगमध्ये खेळले तेव्हा वेगळा अनुभव आला. इंग्लिश खेळाडूंसोबत नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या", असे हरमनने स्पष्ट केले. 
 

Web Title:  Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur says audience response to Women's Premier League was greater than IPL 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.