भारताच्या महिला संघाची खेळाडू पूजा वस्त्राकर आज अचानक तिच्या एका पोस्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांचा एक फोटो पोस्ट केला. काँग्रेसने पोस्ट केलेला फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवत तिने 'इम्पॅक्ट प्लेअर ईडी', असे कॅप्शन दिले. पूजाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पण, चूक लक्षात येताच तिने पोस्ट डिलीट करत माफी मागितली. पूजाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फोटो असून त्याला 'वसूली टायटन्स' असे नाव देण्यात आले. (Pooja Vastrakar Post)
तिने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून म्हटले की, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक अत्यंत आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. माझा फोन माझ्याकडे नव्हता. त्यामुळे हे कसे घडले याची मला कल्पना नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझ्या मनात केवळ आदर आहे. म्हणून झालेल्या चुकीबद्दल मी मनापासून माफी मागते.
पूजा वस्त्राकरच्या या पोस्टचा दाखला देत चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी म्हटले की, जय शाह यांच्याकडून पूजा वस्त्राकरचे करिअर आता धोक्यात आहे. खरं तर जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव आहेत. तर, अनेकांनी स्टोरी डिलीट केल्यावरून दबावतंत्र, लोकशाही यावरून प्रश्न उपस्थित केले.
Web Title: Indian women's cricket team player pooja vastrakar criticized BJP by posting content like 'Recovery Titans', apologized to Prime Minister Narendra Modi after realizing the mistake
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.