Join us  

बॉयफ्रेंडसोबत दिसली 'नॅशनल क्रश', स्मृतीला पलाशसोबत पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा!

Smriti Mandhana With Her Boyfriend: स्मृती मानधना तिच्या खेळीमुळे सर्वदूर प्रसिद्ध आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:16 AM

Open in App

Smriti Mandhana Latest News: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या खेळीमुळे तर प्रसिद्ध आहेच... पण ती तिच्या सौंदर्यामुळे देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिचे लाखो चाहते आहेत. स्मृतीची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांनी आता मात्र 'नॅशनल क्रश'ची फिरकी घेतल्याचे दिसते; काही महिन्यांपूर्वी महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL 2024) स्मृती मानधनाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने किताब जिंकला. स्पर्धेच्या दुसऱ्याच हंगामात आरसीबीला ट्रॉफी जिंकण्याची किमया साधता आली. (Smriti Mandhana And Palash Muchhal)

दरम्यान, स्मृती मानधनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बॉयफ्रेंड पलाश मुच्छलसोबत दिसत आहे. स्मृतीच्या व्हिडीओचा दाखला देत चाहते भन्नाट कमेंट्स करत आहेत. काहींनी तर तिच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करत आक्षेर्पाह प्रतिक्रिया दिल्या. खरं तर टीम इंडिया आगामी काळात बांगलादेशविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. 

दरम्यान, पलाश हा इंदौरचा रहिवाशी असून तो पेशाने एक गायक आहे. गतवर्षी २०२३ मध्ये स्मृती आणि पलांश दोघांच्या रिलेशनशीपचे वृत्त माध्यमांत आले. पलाशने एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गाऊन ते स्मृतीला डेडिकेट केले होते, तर आय लव्ह यू टू स्मृती.. असेही त्याने म्हटले होते. महिला प्रीमिअर लीगमध्ये चॅम्पियन झाल्यानंतर दोघांमधील प्रेमाची जादू की झप्पी पाहायला मिळाली होती. 

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी. हेमलता, साजना सजीवन, रिचा घोष, यास्तिका भाटिया, राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, साइका इशाक, आशा शोभना, रेणुका सिंग आणि तितास साधू,

IND vs BAN ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक 

२८ एप्रिल - पहिला सामना - सिल्हेट३० एप्रिल - दुसरा सामना - सिल्हेट२ मे - तिसरा सामना - सिल्हेट६ मे - चौथा सामना - सिल्हेट९ मे - पाचवा सामना - सिल्हेट

टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघसेलिब्रिटीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट