Join us  

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटू एनसीएत करणार तयारी

आॅगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिका खेळविण्यात येणार आहे. त्यासाठी महिला संघाचा कार्यक्रमही आखण्यात आला. २५ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीत २० खेळाडूंचे शिबिर होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 9:10 PM

Open in App

सचिन कोरडे : गेल्या वर्षभरात भारतीय महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदललाय. दर्जेदार प्रदर्शनामुळे संघाने उंची गाठली. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला क्रिकेटला प्राधान्य देण्याचे ठरविले असून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांची संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच, पुढील महिन्यात भारतीय महिला संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल. त्याआधी, बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत खेळाडूंचे शिबिर असेल. या शिबिरात गोव्याची अष्टपैलू खेळाडू शिखा पांडे ही सुद्धा सहभागी होईल. 

आॅगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिका खेळविण्यात येणार आहे. त्यासाठी महिला संघाचा कार्यक्रमही आखण्यात आला. २५ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीत २० खेळाडूंचे शिबिर होत आहे. या शिबिरासाठी काही नव्या चेहºयांनाही संधी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, नवनियुक्त प्रशिक्षक रमेश पोवार आणि साहाय्यक प्रशिक्षक बिजू जॉर्ज हे सुद्धा या संघासोबत जुळणार आहेत.  विश्वचषक आणि आशिया स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी शिखा पांडे ही सुद्धा या शिबिराचा भाग आहे. 

यासंदर्भात, जीसीएचे सचिव दया पागी म्हणाले, शिखा आता श्रीलंका दौºयासाठी तयारी करीत आहे. ती बंगळुरू येथील शिबिरात सहभागी होत आहे. बीसीसीआयकडून तसे पत्रही मिळाले आहे. भारतीय संघात गोव्याची खेळाडू असणे खूप अभिमानास्पद आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून शिखाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तिच्याकडून चांगल्या अपेक्षा असतील. ती खूप मेहनत घेत आहे. जीसीएकडून तिला खूप शुभेच्छा. 

 

फिटनेसवर भर...

अष्टपैलू खेळाडू शिखा पांडे हिने गेल्या महिनाभरापासून आगामी दौºयासाठी तयारी सुरू केली. गोवा क्रिकेट संघटनेच्या अकादमीत ती सकाळी आणिसायंकाळी अशा दोन सत्रांत सराव करीत होती. तिचा सर्वाधिक वेळ  जीममध्ये वर्कआउट करण्यात जात होता. 

टॅग्स :बीसीसीआयक्रिकेट