भारतीय महिलांची दमदार विजयी सुरुवात; यजमान दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात

वन-डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-१ ने धूळ चारल्यानंतर भारतीय महिला संघाने आता टी-२० मालिकेतही विजयी सुरुवात केली. तीन सामन्यांच्या मालिकेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने यजमान संघाचा पराभव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:36 PM2018-02-13T23:36:10+5:302018-02-13T23:36:24+5:30

whatsapp join usJoin us
Indian women's strong start; The hosts beat South Africa by 7 wickets | भारतीय महिलांची दमदार विजयी सुरुवात; यजमान दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात

भारतीय महिलांची दमदार विजयी सुरुवात; यजमान दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पोचेफस्ट्रम : वन-डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-१ ने धूळ चारल्यानंतर भारतीय महिला संघाने आता टी-२० मालिकेतही विजयी सुरुवात केली. तीन सामन्यांच्या मालिकेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने यजमान संघाचा पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६४ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात मिताली राजची (५४ धावा, ४८ चेंडू) अर्धशतकी खेळी आणि स्मृती मानधनाची आक्रमक २८ धावांच्या खेळींच्या जोरावर भारताने ७ चेंडू व ७ गडी राखून विजय साकारला. मितालीने पहिल्या पाच षटकांत भारताला अर्धशतक गाठून दिले होते. स्मृती चांगल्या फॉर्मात होती. तिने १५ चेंडूंना सामोरे जाताना २८ धावा फटकावल्या. स्मृतीने दोन षटकार व तीन चौकार लगावले. कर्णधार हरमनप्रीत कौर खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतली, पण आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी युवा जेमिमा रॉड्रिग्सने एक षटकार व चार चौकारांच्या मदतीने ३७ धावांचे उपयुक्त योगदान दिले. तिने कोणतेही दडपण न घेता अनुभवी मितालीसह भारताला विजयी मार्गावर आणण्यात मोलाची कामगिरी केली. रॉड्रिग्स बाद झाल्यानंतर वेदा कृष्णमूर्तीने (२२ चेंडू, ३७ धावा, ३ चौकार, ३ षटकार) मितालीसह भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचविले. अखेर भारताने विजयी लक्ष्य १८.५ षटकांत केवळ तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
त्याआधी, प्रथम फलंदाजी करणाºया द. आफ्रिकाने २० षटकांत ४ बाद १६४ धावांची मजल मारली. कर्णधार निकर्कने शानदार ३८ धावांची खेळी केली. ट्रायन ३२ धावा काढून नाबाद राहिली. भारतातर्फे अनुजा पाटीलने दोन बळी घेतले. (वृत्तसंस्था)

धावफलक
दक्षिण आफ्रिका : ली झे. कौर गो. पांडे १९, निकर्क पायचित गो. पाटील ३८, लुस झे. पांडे गो. वस्त्रकार १८, प्रीज झे. कृष्णमूर्ती गो. पाटील ३१, क्लार्क नाबाद २३, ट्रायोन नाबाद ३२. अवांतर (३). एकूण २० षटकांत ४ बाद १६४.
बाद क्रम : १-२६, २-६२, ३-८४, ४-१३०.
गोलंदाजी : वस्त्रकार ४-०-३४-१, पांडे ४-०-४१-१, पाटील ४-०-२३-२, राधा यादव ३-०-२१-०, यादव ३-०-३१-०, कौर २-०-१४-०.

भारत :- मिताली राज नाबाद ५४, मंधाना झे. निकर्क गो. डॅनियल्स २८, कौर धावबाद ००, रॉड्रिगुज झे. न्तोजाके गो. निकर्क ३७, कृष्णमूर्ती नाबाद ३७. अवांतर (१२). एकूण १८.५ षटकांत ३ बाद १६८.
बाद क्रम : १-४७, २-४७, ३-११६.
गोलंदाजी : काप २-०-३२-०, इस्माईल ३-०-३५-०, डॅनियल्स
४-०-१६-१, खाका १-०-१५-०, निकर्क ४-०-२३-१,
न्तोजाके ४-०-३४-०,
ट्रायन ०.५-०-८-०.

द. आफ्रिकेत उपस्थित राहून जेमिमाची पदार्पणातील शानदार फलंदाजी पाहून आनंद झाला. तिने दमदार पदार्पण केले असून जेमिमाने आपल्यावर ठेवण्यात आलेला विश्वास सार्थ ठरविला. जेमिमाने आपण टी२० क्रिकेटसाठी योग्य असल्याचे सिद्ध केले. विशेष म्हणजे तिने मिळालेल्या संधीचे सोने केले. देशाकडून खेळण्याचे स्वप्न जेमिमाने पूर्ण केले असून यासाठी देवाचे खूप आभार मानतो. आम्हाला तिच्या खेळीचा अभिमान आहे.
- आयवन रॉड्रिग्ज, जेमिमाचे वडिल.

Web Title: Indian women's strong start; The hosts beat South Africa by 7 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.