Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; भारत सातव्यांदा जिंकणार किताब? 

महिला आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 12:17 PM2022-09-21T12:17:23+5:302022-09-21T12:18:05+5:30

whatsapp join usJoin us
Indian women's team announced for women's asia cup 2022 | Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; भारत सातव्यांदा जिंकणार किताब? 

Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; भारत सातव्यांदा जिंकणार किताब? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. दरम्यान, महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 15 ऑक्टोंबर दरम्यान बांगलादेशच्या यजमानपदात सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket stadium) पार पडणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे महिला आशिया चषकात भारतीय संघ सर्वात यशस्वी संघ असून भारताने आतापर्यंत सहावेळा या स्पर्धेचा किताब पटकावला आहे. 

7 संघांमध्ये रंगणार 'सामना' 
ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात यूएईमध्ये महिला टी-20 विश्वचषक पात्रता फेरीनंतर ही स्पर्धा होणार आहे. आयसीसीने मागील काही दिवसांपूर्वी आपला फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता. ज्यामध्ये ऑक्टोबरमधील 2 आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ 27 किंवा 28 सप्टेंबरपर्यंत बांगलादेशला पोहोचतील.

आशिया चषक 2022 साठी भारतीय महिला संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सब्बिनेनी मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नवगिरे. 

स्टँडबाय खेळाडू - तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर.

बांगलादेश क्रिकेट बोर्ड महिला समितीचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नादेल यांनी सांगितले होते की, "बोर्डासाठी विमानतळ आणि हॉटेल जवळ असल्याचा विचार करता सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच इथे सात संघाच्या राहण्याची व्यवस्था देखील करता येईल. महिला आशिया चषकाचे सामने सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या ग्राउंड 1 मध्ये खेळवले जातील तर ग्राउंड 2 मध्ये संघांना सराव करता येईल." लक्षणीय बाब म्हणजे ऑक्टोबर 2018 पासून पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद बांगलादेश सांभाळणार आहे.

भारतीय महिला सातव्यांदा जिंकणार किताब? 
2012 पासून महिला आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी हे 2018 मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, जिथे बांगलादेशने सहा वेळच्या चॅम्पियन भारताचा शेवटच्या चेंडूवर पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. 
 

Web Title: Indian women's team announced for women's asia cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.