मेलबोर्न : आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी टी-२० मालिकेत भारतीय महिलांनी आॅस्ट्रेलियावर शनिवारी सात गडी राखून मात केली आहे. स्मृती मानधनाने झळकावलेले अर्धशतक व तिला इतर फलंदाजांनी दिलेली सर्वोत्तम साथ या जोरावर भारतीय महिलांनी १७४ धावांचे आव्हान सहज गाठले.दरम्यान, या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने अनोख्या विक्रमाशी बरोबरी साधली. महिला टी-२० क्रिकेटमध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याच्या विंडीजच्या डेंड्रा डॉटीनच्या विक्रमाशी हरमनप्रीतने बरोबरी केली. हरमनप्रीत कौरने नाबाद २० धावांची खेळी केली. दीप्ती शर्माने नाबाद ११ धावा केल्या. स्मृती मानधना व शेफाली वर्मा यांनी केलेल्या भक्कम सुरुवातीनंतर हरमनप्रीतने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.आॅस्ट्रेलियाने अॅश्ले गार्डनरच्या ४७ चेंडंूतील ९३ धावांच्या बळावर ५ बाद १७३ धावा उभारल्या. मॅग लेनिंगने २२ चेंडूंत ३७ धावा केल्या. भारताने १९.४ षटकात विजयी लक्ष्य गाठले. शेफाली वर्माने२८ चेंडूंत ४९ आणि मानधनाने ४८ चेंडूंत ५५ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने १९ चेंडूंत ३० धावांचे योगदान दिले.विजयासह भारत गुणतालिकेत इंग्लंडपाठोपाठ दुसऱ्या स्थानी आहे. आॅस्ट्रेलिया- इंग्लंड यांच्यात आज, रविवारी होणाºया अखेरच्या साखळी सामन्यातील निकालानंतर फायनल कोणत्या दोन संघात खेळली जाईल, हे निश्चित होणार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून मात
भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून मात
तिरंगी मालिका । स्मृती मानधनाची अर्धशतकी खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 4:23 AM