पोचेस्ट्रम(Potchefstroom)- भारतीय महिला संघानं टी-20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनं दणदणीत पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघानं 18.5 षटकांत 168 धावा करत विजय मिळवला आहे. भारतीय महिला फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना संधीच दिली आहे. दक्षिण आफ्रिकेवरील विजयासह टी-20 मालिकेत भारती महिला संघानं 1-0नं आघाडी घेतली आहे.सलामीवीर मिताली राज हिनं 54 धावांसह संघाला चांगली सुरुवात करून दिली. मितालीनं 48 चेंडूंत सहा चौकार आणि एक षटकार लगावला आहे. तर मिताली राज(54) व स्मृती मंधना(28) यांनी पहिल्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली आहे. तर पदार्पणातच मिताली राज आणि जेमिमा रॉड्रिग्जनं तिस-या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली आहे. मिताली राज आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी (नाबाद 37) धावांची भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. वेदानं 22 चेंडूंच्या मोबदल्यात तीन चौकार आणि तीन षटकार लगावले आहे. नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेची सलामीची फलंदाज आणि कर्णधार डेन वार्न नीकर्क (38) आणि क्लो टायरन (नाबाद 32) धावांची खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली. तर वेदानंही 31 धावांची खेळी केली आहे. क्लो टायरन आणि क्लार्क यांनी शेवटपर्यंत मैदानावर राहत चार गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या होत्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत मालिकेत 1-0नं घेतली आघाडी
भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत मालिकेत 1-0नं घेतली आघाडी
भारतीय महिला संघानं टी-20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनं दणदणीत पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघानं 18.5 षटकांत 168 धावा करत विजय मिळवला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 9:20 PM