नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचे युग आहे, त्यामुळे कोणतीही सामान्य व्यक्ती सेलिब्रेटींपर्यंत आपले विचार पोहचवू शकते. मात्र अनेकदा यामुळे सेलिब्रेटिंना मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळते. कारण सोशल मीडियावरील नेटकरी त्यांना ट्रोल करत असतात. याआधी अशा प्रकारच्या ट्रोलिंगकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करायचे, मात्र आता सेलिब्रिटींनीही या ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. अलीकडेच जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेश हिने ट्रोलर्सचा समाचार घेतला होता. आता याचाच प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे.
ट्रोलर्सला शिकवला धडा
खरं तर भारतीय महिला संघाची खेळाडू यास्तिका भाटिया हिने ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी जेव्हा एका ट्विटर युजरने भारतीय महिला क्रिकेटर यास्तिका भाटियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यास्तिकानेही सडेतोड उत्तर देऊन ट्रोल करणाऱ्याचाच समाचार घेतला. यास्तिकाच्या एका ट्विटने या घटनेची सुरुवात झाली, जेव्हा तिने वरिष्ठ महिला आंतर विभागीय टी-20 ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत साउथ झोनला वेस्ट झोनविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. यानंतर एका ट्विटला रिट्विट करताना यास्तिकाने "टीम वेस्ट" अशा आशयाचे कॅप्शन लिहले.
यानंतर संबंधित युजरने यास्तिकावर निशाणा साधताना लिहले की, "अरे बहन, मत खेल टी-20" या युजरची कमेंट पाहून यास्तिकाचा देखील पारा चढला आणि त्याला सडेतोड उत्तर दिले. तिने ट्रोलरला त्याच्याच भाषेत उत्तर देताना लिहले, "मग काय तुझ्यासारखी घरी बसून कमेंट करत बसू का?"
यास्तिकाला भारतीय संघातून वगळलं
यास्तिकाचे हे उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांपासून यास्तिका भारतीय महिला टी-20 संघातून बाहेर आहे. यास्तिका भाटिया इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये बॅकअप यष्टिरक्षक म्हणून होती, परंतु टी-20 आणि नंतर आशिया चषकासाठी तिला संघात स्थान मिळाले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Indian women's team player Yastika Bhatia has responded to trolls' criticism
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.