विराट कोहली नव्हे तर MS Dhoniच्या नेतृत्वाखाली खेळायचंय भारताच्या महिला क्रिकेटपटूला

धोनीनं 200 वन डे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:03 PM2020-04-11T17:03:57+5:302020-04-11T17:04:42+5:30

whatsapp join usJoin us
Indian women's team star Jemimah Rodrigues wants to play under MS Dhoni's captaincy svg | विराट कोहली नव्हे तर MS Dhoniच्या नेतृत्वाखाली खेळायचंय भारताच्या महिला क्रिकेटपटूला

विराट कोहली नव्हे तर MS Dhoniच्या नेतृत्वाखाली खेळायचंय भारताच्या महिला क्रिकेटपटूला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मधल्या फळीचा सक्षम फलंदाज आणि एक सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणूनही धोनी जगात नावाजला जातो. धोनी हा आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं वन डे आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. पण, सध्या त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. पण, तरीही विराट कोहलीपेक्षा धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्याची इच्छा भारतीय महिला संघाच्या फलंदाजानं व्यक्त केली आहे.

Video: लॉकडाऊनमुळे Ajinkya Rahane आनंदी; पत्नीकडून शिकतोय नवी Recipe

भारती संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रीग्जनं धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेमिमानं धोनीच्या नेतृत्वकौशल्याचं कौतुक केलं आणि त्याचा खेळ पाहून लहानाची मोठी झाल्याचं तिनं सांगितलं. ती म्हणाली,''महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल. त्याचा खेळ पाहून लहानाची मोठी झाली आणि वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं नेतृत्वाचं कौशल्य दाखवून दिलं. त्याच्याबद्दल मुलाखतीतून बरंच काही ऐकलं आहे आणि त्याच्यासारखा कर्णधार पाहिला नाही, असं अनेक जणं सांगतात. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली वन डे संघात खेळणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे.''

धोनीनं 200 वन डे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे आणि त्यापैकी 110 सामने जिंकले आहेत. 74 सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला. 200 पेक्षा अधिक वन डे क्रिकेटमध्ये नेतृत्व करणाऱ्या धोनीची विजयी टक्केवारी 59.52 इतकी आहे. या टक्केवारीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ( 76.14) अव्वल आहे, तर धोनी दुसऱ्या स्थानी आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल अन् भारतीय मुलीची Untold Love Story; अशी पडली ऑसी खेळाडूची विकेट!

मोठी बातमी : भारताच्या क्रिकेटपटूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!

Corona Virusनं भारताच्या अम्पायरला झाडावर चढवले; नेमके काय घडले?

देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच

Corona Virus : विराट कोहलीपाठोपाठ RCBचा मदतीचा हात; सैन्य, आरोग्य सेवकांसाठी मोठा निर्णय

Video : शोएब अख्तरचा प्रताप; नेटिझन्सकडून होतोय जोरदार ट्रोल

 

Web Title: Indian women's team star Jemimah Rodrigues wants to play under MS Dhoni's captaincy svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.