Join us  

भारतीय महिलांचा श्रीलंकेविरुद्ध विजय

मुंबईकर आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने सलग तीन षटकार ठोकत श्रीलंकेविरुद्ध तुफानी फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:10 AM

Open in App

कतुनायके(श्रीलंका): मुंबईकर आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने सलग तीन षटकार ठोकत श्रीलंकेविरुद्ध तुफानी फटकेबाजी केली. जेमिमाच्या जोरावर भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बुधवारी श्रीलंकेचा १३ धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६८ धावांची मजल मारली. यानंतर श्रीलंकेचा डाव १९.३ षटकात १५५ धावांत संपुष्टात आला. पूनम यादवची (४/२६) भेदक गोलंदाजी भारतासाठी निर्णायक ठरली.१८ वर्षीय जेमिमाने १५ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करत ३६ धावा ठोकल्या. सलग तीन षटकार मारणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. जेमिमाने तानिया भाटिया(३५ चेंडूत ४६ धावा) व अनुजा पाटील(२९ चेंडूत ३६) यांच्यासह चांगली भागीदारी करीत भारताला २० षटकांत ८ बाद १६८ धावा उभारून दिल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लंकेनेही आक्रमक सुरुवात केली. यशोदा मेंडिस (३२), चामरी अटापट्टू (२७) व एशानी लोकुसुरियाने (४५) यांनी लंकेच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र पूनम यादवने भेदक मारा करीत श्रीलंकेचा विजय हिसकावला.संक्षिप्त धावफलकभारत महिला : २० षटकात ८ बाद १६८ धावा (तानिया भाटिया ४६, जेमिमा रॉड्रिग्ज ३६, अनुजा पाटील ३६; उदेशिका प्रबोधनी २/१८, चमारी अटापट्टू २/२३) वि.वि. श्रीलंका महिला : १९.३ षटकात सर्वबाद १५५ धावा (एशानी लोकुसुरिया ४५, यशोदा मेंडिस ३२; पूनम यादव ४/२६.)

टॅग्स :भारतश्रीलंका