- अयाझ मेमन/> इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ जोमाने लढला. पण अखेर भारताला १-४ अशा पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघांमध्ये फरक फार मोठा नव्हता. पण ही मालिका भारतासाठी खूप काही शिकवणारी ठरली. आपली जमेची बाजू योग्यपणे हाताळण्यात अपयशी ठरलो, तर आपण विजयी परिस्थितीतूनही पराभवाच्या गर्तेत सापडतो, हे विराट सेनेला शिकायला मिळाले. या मालिकेत कर्णधार विराट कोहली वगळता इतर कोणालाही कामगिरीत सातत्य राखता आले नाही.>शिखर धवन (१० पैकी ३)स्विंग चेंडूविरुद्ध खेळताना धवन तांत्रिकदृष्ट्या खूप अडखळताना दिसला. संपूर्ण मालिकेत तो एकाच प्रकारच्या चेंडूवर एकाच पद्धतीने बाद झाला. परदेशातील त्याचा अत्यंत खराब रेकॉर्ड त्याच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करणारा आहे.>दिनेश कार्तिक (१० पैकी २)मालिका सुरू झाली तेव्हा यष्टीरक्षक म्हणून कार्तिक भारतीय संघाची पहिली पसंती ठरला होता. पहिल्या दोन कसोट्यांमध्ये तो खेळलाही, पण त्यानंतर त्याला संघाबाहेर बसावे लागले. तो फॉर्म कायम राखू न शकल्याने त्याला बाहेर बसावे लागले.>इशांत शर्मा (१० पैकी ७.५)अचूकता, वेग आणि विविधता यामुळे इशांतची संघात निवड झाली. त्याने आपली निवड सार्थ ठरविताना शानदार मारा केला.>जसप्रीत बुमराह(१० पैकी ७.५)दुर्दैवाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांना बुमराह मुकला. त्याने आपल्या आगळ्या शैलीने आणि अचूकतेने सर्वच फलंदाजांची परीक्षा घेतली. तो यंदाच्या वर्षात भारतासाठी मोलाचा खेळाडू ठरला आहे.>लोकेश राहुल(१० पैकी ५.५)संघातील आघाडीच्या ३ फलंदाजांपैकी एक असलेला राहुल सर्व कसोटी सामने खेळला. पण अखेरच्या सामन्यातील दुसऱ्या डावात शतक झळकावून त्याने स्वत:ची गुणवत्ता दाखवली. त्याची खेळी शानदार ठरली यात वाद नाही, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.>विराट कोहली(१० पैकी ८ गुण)फलंदाज म्हणून कोहली जबरदस्त ठरला. त्याने मालिकेत सर्वाधिक ५९३ धावा काढल्या. २०१४ सालातील अपयश मागे टाकत त्याने यंदा जबरदस्त वर्चस्व राखले. एक आक्रमक कर्णधार म्हणून लक्ष वेधले असले, तरी तांत्रिकदृष्ट्या तो थोडा मागे पडला.>अजिंक्य रहाणे(१० पैकी ५.५)मालिकेत दोन अर्धशतके झळकावली असली, तरी रहाणेसाठी ही मालिका अपयशीच ठरली असे म्हणावे लागेल. अजूनही तो फॉर्म मिळवण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी झगडत आहे. तो विदेशी मैदानांवरील भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे.>चेतेश्वर पुजारा(१० पैकी ६.५)चौथ्या कसोटीत पुजाराने उपयुक्त शतकी खेळी केली. तो कोहलीनंतर भारताचा सर्वांत महत्त्वाचा फलंदाज दिसत होता. पण तरीही त्याला लौकिकानुसार खोºयाने धावा काढता आल्या नाहीत.>मुरली विजय(१० पैकी १)भारताचा सर्वांत अनुभवी आणि भरवशाचा सलामीवीर म्हणून विजयकडे पाहिले जात होते. पण पहिल्या दोन सामन्यांतील अपयशानंतर त्याला मायदेशी पाठविण्यात आले. त्यामुळे आता त्याचे भविष्य धोक्यात आहे.>हनुमा विहारी(१० पैकी ६)अखेरच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलेल्या विहारीच्या निवडीवर थोडा वाद झाला. पण त्याने अप्रतिम अर्धशतक झळकावताना आपली उपयुक्तता सिद्ध केली. याशिवाय त्याने ३ बळीही घेतले.>रिषभ पंत (१० पैकी ५.५)अखेरच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमधील पहिले वैयक्तिक शतक झळकावताना रिषभने आपली प्रतिभा दाखवली. पण त्याचवेळी यष्टीरक्षणामध्ये मात्र तो अपयशी ठरला. सध्या तो केवळ १९ वर्षांचा असल्याने त्याच्याकडे कामगिरीत सुधारणा करण्यास खूप संधी आहे. जर यात तो यशस्वी ठरला तर तो नक्कीच आपली वेगळी ओळख निर्माण करेल.>रविचंद्रन अश्विन (१० पैकी ५)पहिल्या कसोटीतून अश्विनने जबरदस्त सुरुवात केली, पण त्यानंतर तो अपयशी ठरला. विशेष करून चौथ्या कसोटीमध्ये परिस्थिती त्याच्यासाठी योग्य असतानाही तो अपयशी ठरला याचे दु:ख अधिक आहे. तो दुखापतग्रस्त होता की त्याची कामगिरी ढासळली, याबाबत अजूनही संभ्रम आहे.>हार्दिक पांड्या(१० पैकी ६.५)गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये हार्दिक फार काही करू शकला नाही. संघाला ज्या अष्टपैलू खेळीची त्याच्याकडून अपेक्षा होती, त्यात तो अपयशी ठरला.>रवींद्र जडेजा (१० पैकी ७)संपूर्ण मालिकेत जडेजाला अखेरच्या सामन्यात संधी मिळाली. पण याच सामन्यात दमदार कामगिरी करताना त्याने ७ गडी बाद केले आणि शानदार नाबाद अर्धशतकही ठोकले. यासह त्याने स्वत:ची संघातील अव्वल अष्टपैलू अशी ओळखही सिद्ध केली. क्षेत्ररक्षणातही त्याने छाप पाडली.>मोहम्मद शमी (१० पैकी ७)मालिकेतील आकडेवारी शमीच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण करू शकत नाही. अखेरच्या सामन्यात त्याने अनेकदा फलंदाजांना चकवले. तसेच थोडक्यात फलंदाज त्याच्याविरुद्ध बाद होण्यापासून वाचले. त्याने वेगात आणि अचूक टप्प्यावर मारा केला. त्याच्या फलंदाजीवरही काही प्रमाणात लक्ष द्यावे लागेल.>उमेश यादव (१० पैकी ६)दुर्दैवाने उमेशला केवळ एकच कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण असलेल्या लॉडर््स कसोटीमध्ये त्याला संधी मिळायला हवी होती. त्याने अनेकदा सिद्ध केले आहे की तो कोणत्याही वेगवान गोलंदाजाची जागा घेऊ शकतो. तो न थकता सलग वेगवान मारा करू शकतो.>कुलदीप यादव (१० पैकी २)उमेशप्रमाणेच कुलदीपही केवळ एकच कसोटी सामना खेळला. तो कदाचित चौथ्या किंवा पाचव्या सामन्यात फायदेशीर ठरला असता. त्याला लॉडर््स कसोटी सामन्यासाठी संघात घेण्यात आले जेथे परिस्थिती अगदी त्याच्याविरोधात होती. यानंतर त्याला संघाबाहेरच बसावे लागले.(संपादकीय सल्लागार)