आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) शुक्रवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मागे टाकून ऑस्ट्रेलियन संघानं अव्वल स्थान पटकावलं. न्यूझीलंडचे दुसऱ्या स्थानी प्रमोशन झाले असून टीम इंडिया थेट तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. ऑक्टोबर 2016नंतर टीम इंडियाला 42 महिन्यानंतर कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानावरून पायउतार व्हावे लागले.
कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा होत नसतानाही आयसीसीनं जाहीर केलेल्या या क्रमवारीनं सर्वांना धक्का बसला. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव पत्करावा लागला. त्याचा फटका टीम इंडियाला क्रमवारीत बसला. आयसीसीनं ही क्रमवारी जाहीर करताना 2017नंतरच्या कसोटी मालिकांचे निकाल ग्राह्य धरले. त्यामुळे टीम इंडियाची 114 गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरण झाली. ऑस्ट्रेलिया ( 116) आणि न्यूझीलंड ( 115) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.
भारतीय संघ कसोटी क्रमवारीत 42 महिने अव्वल स्थानावर होता. कसोटीत अव्वल स्थानावर सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर विराजमान होणाऱ्या संघात भारतीय संघ सातव्या क्रमांकावर आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाचा (1952-55) 41 महिन्यांचा विक्रम मोडला. पण, या विक्रमात भारताच्या पुढे सहा संघ कोणते ते पाहूया...
- ऑस्ट्रेलिया ( 2001-2009) - 95 महिने
- वेस्ट इंडिज ( 1981-1988) - 89 महिने
- ऑस्ट्रेलिया ( 1959-1963) - 60 महिने
- वेस्ट इंडिज (1964-1968) - 60 महिने
- ऑस्ट्रेलिया (1995-1999) - 44 महिने
- ऑस्ट्रेलिया (1974-1978) - 43 महिने
- भारत (2016-2020) - 42 महिने
- ऑस्ट्रेलिया (1952-1955) - 41 महिने
- इंग्लंड (1970-1973) - 37 महिने
Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार
Herschelle Gibbs करणार 'त्या' ऐतिहासिक खेळीच्या बॅटचा लिलाव
न्यूझीलंडची महिला खेळाडू लै डेंजर; रोहित, सचिनसह कुणालाच नाही जमला हा पराक्रम
विराट कोहलीनं फिल्मी स्टाईलनं दिल्या पत्नी अनुष्का शर्माला शुभेच्छा