श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये एक पिच रोलर गायब झाल्यामुळे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू परवेझ रसूल अडचणीत सापडला आहे. हा पिच-रोलर परवेझ रसूलने चोरल्याचा दावा जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनने केला आहे. परवेझ रसूलने हा पिच-रोलर परत करावा अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनने दिला आहे. (India's all-rounder Pervez Rasool steals pitch-roller, now hanging sword of action)
याबाबत जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेने परवेझ रसूलला सांगितले की, तुमच्याकडे जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेची मालमत्ता आहे. याबाबत पोलीस कारवाईसह कुठलीही कठोर कारवाई करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सूचित करतो की, तुम्ही एका आठवड्याच्या आत संघटनेची मालमत्ता परत करावी. अन्यथा आम्ही कुठलीही कारवाई करण्यासाठी स्वतंत्र असू.मात्र जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेने केलेला आरोप परवेझ रसूलने फेटाळून लावला आहे. इंडियन एक्स्प्रेसने परवेझ रसूलच्या हवाल्याने सांगितले की, एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्याने जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटला आपले तन मन अर्पित केले. त्याच्यासोबत वागण्याची ही पद्धत आहे का?
दरम्यान, बीसीसीआयकडून जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेला चालवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन सदस्यांपैकी एक असलेल्या अनिल गुप्ता यांनी सांगितले की, हे प्रकरण विनाकारण वाढवण्यात आले. आम्ही केवळ परवेझ रसूललाच नाही तर ज्यांनी जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेचे सामान नेले आहे अशा सर्व जिल्हा असोसिएशनना याबाबत पत्र लिहिले आहे. आमच्याकडे नोंद असलेल्या सर्वांना आम्ही पत्र लिहिले आहे. मात्र हे पत्र का लिहिले गेले असे वाटून परवेझ रसूल दुखावला गेला आहे.
परवेझ रसूल हा अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा गावातील रहिवासी आहे. जेकेसीएने आधी बिजबेहरामधील मोहम्मद शफीला नोटिस पाठवले होते. त्यानंतर परवेझ रसूलला अशाच प्रकारचे पत्र पाठवले. रसूलच्या नावाची रजिस्टरमध्ये नोंद होती. त्यामुळे त्याला पत्र पाठवण्यात आले, असे अनिल गुप्ता यांनी सांगितले.
Web Title: India's all-rounder Pervez Rasool steals pitch-roller, now hanging sword of action
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.