दुबई - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीचा फायदा भारतीय संघासह संघातील खेळाडूंनाही झाला आहे. या मालिकेत 5-1 अशा फरकाने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थान भक्कम केले आहे. त्याबरोबरच कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे, तर जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आटोपल्यानंतर मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या सुधारीत क्रमवारीत भारतीय संघाला बंपर फायदा झाला आहे. या मालिकेत मिळवलेल्या मोठ्या विजयाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला अव्वलस्थानावरून खाली खेचून भारतीय संघ कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रमवारीतही अव्वलस्थानावर विराजमान झाला आहे. भारतीय संघासोबतच संघातील खेळाडूंनाही एकदिवसीय मालिकेतील चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. विराट कोहलीने सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एक अर्धशतक आणि तीन शतकांसह 186 च्या सरासरीने 558 धावा कुटल्या होत्या. विराटने फटकावलेल्या 558 धावा ह्या कुठल्याही द्विपक्षीय मालिकेत फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावा आहेत. सध्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या विराटच्या खात्यामध्ये एकूण 909 रेटिंग गुण असून, कुठल्याही भारतीय फलंदाजाने मिळवलेले ते सर्वाधिक गुण आहेत. एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराटपाठोपाठ एबी डीव्हिलियर्स दुसऱ्या आणि डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानी आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्मा सहाव्या आणि शिखर धवन दहाव्या स्थानी आहेत. गोलंदाजांमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराने दोन स्थानांनी प्रगती करत दुसरे स्थान पटकावले आहे. बुमराहच्या खात्यात सध्या 787 गुण आहेत. अफगाणिस्तानचा गोलंदाज रशिद खान याच्या खात्यातही एवढेच गुण आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताच्या युझवेंद्र चहललासुद्धा फायदा झाला असून, त्याने अव्वल 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तर कुलदीप यादवने मालिकेत 17 विजय मिळवत 15 वे स्थान पटकावले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वनडे मालिकेतील विजयाने टीम इंडियाची बल्ले बल्ले, विराट, बुमराहची क्रमवारीत गरुडझेप
वनडे मालिकेतील विजयाने टीम इंडियाची बल्ले बल्ले, विराट, बुमराहची क्रमवारीत गरुडझेप
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीचा फायदा भारतीय संघासह संघातील खेळाडूंनाही झाला आहे. या मालिकेत 5-1 अशा फरकाने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थान भक्कम केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 5:04 PM