लंडन : पहिला सामना गमविल्यानंतर भारतीय संघाला आज गुरुवारपासून लॉडर््सवर इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान असेल. विजयासाठी कर्णधार कोहलीला फलंदाजीत अन्य सहकाऱ्यांची साथ मिळणे आवश्यक राहील.विराटला सहकाºयांची साथ लाभली असती तर बर्मिंगहॅवर निकाल वेगळा लागला असता. विजयाच्या दारात उभा असलेला भारत ३१ धावांनी पराभूत झाला नसता. दुसºया सामन्याआधी मात्र भारतीय ड्रेसिंग रुममध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लॉडर््सच्या खेळपट्टीवर दोन दिवसांआधी गवत होते. सामन्यापूर्वी ते राहणार नाही, अशी अपेक्षा आहे. पण असे न झाल्यास खेळपट्टी शुष्क राहील. असे झाल्यास गोलंदाजीबाबत विचार करावा लागेल. गोलंदाजी कोच भारत अरुण यांनी अतिरिक्त गोलंदाज खेळविण्यास नकार दिला. दुसºया फिरकीपटूचा विचार होऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले. अशावेळी उमेश यादव बाहेर बसेल. ईशांत, शमी आणि हार्दिक पांड्या हे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. दुसºया फिरकीपटूसाठी रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांच्यापैकी एकाचा विचार होईल.फलंदाजीबाबत बोलायचे तर यंदा कौंटी क्रिकेट खेळणारा चेतेश्वर पुजारा पहिल्या कसोटीत बाहेर बसला. त्याची जागा घेणारा लोकेश राहुल भोपळा न फोडताच बाद झाला होता. भारतीय संघ व्यवस्थापनानुसार एजबस्टनची खेळपट्टी कठीण होती, त्यामुळे फलंदाजीत प्रयोग होऊ शकतात. कोहलीच्या नेतृत्वात ३६ कसोटीत वेगवेगळे अंतिम एकादशचे प्रयोग झाले. तरीही फलंदाजी क्रमाला स्थायित्व लाभलेले नाही.दुसरीकडे इंग्लंडने डेव्हिड मालानला बाहेर केले. तसेच, बेन स्टोक्स कायदेशीर प्रकरणात अडकल्याने खेळणार नाही. याशिवाय संघात दोन फिरकी गोलंदाज ठेवायचे की नाही हे कर्णधार जो रुटला ठरवावे लागेल. मोईन अलीची साथ देण्यास २० वर्षांचा आॅलिव्हर पोपला संधी मिळू शकते. वेगवान माºयाची जबाबदारी जेम्स अॅन्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड व सॅम कुरेन सांभाळतील. (वृत्तसंस्था)>प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, करुण नायर, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.इंग्लंड: जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कूक, कीटोन जेनिग्स, जॉनी बेयरस्टॉ, जोस बटलर, आॅलिव्हर पोप, मोईन अली, आदिल रशीद, जेमी पोर्टर, सॅम कुरेन, जेम्स अॅन्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस व्होक्स.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांवर
भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांवर
पहिला सामना गमविल्यानंतर भारतीय संघाला आज गुरुवारपासून लॉडर््सवर इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान असेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 4:13 AM