अॅडलेड : शतकवीर पुजाराच्या शतकाचा अपवाद वगळता अन्य फलंदाज आॅस्ट्रेलियाच्या वेगवान मा-याचा धैर्याने प्रतिकार करण्यात अपयशी ठरल्याने कमजोर मानल्या जाणा-या यजमानांविरुद्ध भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अडखळत ९ बाद २५० धावा अशी मजल मारली.आॅस्ट्रेलियात पहिल्यांदा मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात आलेल्या भारताला हे आव्हान अत्यंत कठीण असल्याचे कळून चुकले. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत कमकुवत समजल्या जाणाºया आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सर्वोत्कृष्ट फलंदाजीक्रम असलेल्या भारतीय संघाला खिळखिळे केले. शिवाय आमच्या देशात आम्हाला हरविणे किती कठीण आहे, हे देखील स्पष्ट केले.अॅडलेडच्या पाटा खेळपट्टीवर भारताच्या जमेची बाजू पुजाराचे शतक ठरले. त्याने २४८ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह १२३ धावांचे योगदान दिले, दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर तो धावबाद झाला. १६ वे कसोटी शतक नोंदविणाºया पुजाराने एक बाजू सांभाळली नसती, तर भारताचा डाव २०० धावांच्या आतच संपुष्टात आला असता. यासह पुजाराने कसोटी कारकिर्दीत पाच हजार धावाही पूर्ण केल्या. आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लियोन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.एकीकडे यजमान फलंदाजांनी स्वत:ची चोख कामगिरी बजावली, तर दुसरीकडे भारतीयांनी बेजबाबदार फटके मारून त्यांची मदतच केली. आॅस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण आणि त्यांनी घेतलेले झेलदेखील शानदार होत्या. दिवसभरात ८७.५ षटकांत त्यांनी केवळ एकच अतिरिक्त धाव ‘लेगबाय’ दिली. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत भारताने रोहित शर्माला संधी दिली. आॅस्ट्रेलियाकडून मार्कस् हॅरिसने पदार्पण केले.सलामीवीर लोकेश राहुल (२), मुरली विजय (११), विराट कोहली (३) आणि अजिंक्य रहाणे (१३) झटपट बाद होताच उपाहारापर्यंत भारताने ५६ धावांत ४ गडी गमावले. उपाहारानंतर पुजारा-रोहित यांनी पाचव्या गड्यासाठी ४५ धावा केल्या. षटकार मारण्याच्या नादात रोहित बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने पुजारासोबत सहाव्या गड्यासाठी ४१ धावांची भर घातली. अश्विननेही (२५) पुजाराला चांगली साथ दिल्याने भारताने २०० धावा पार केल्या. पुजाराने ८५व्या षटकांत शतक झळकावले. ८७ व्या षटकांत त्याने कमिन्सला एक चौकार व षटकार खेचला. परंतु, पुढच्या षटकात अखेरच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या नादात तो बाद झाला. कमिन्सने फेकलेला चेंडू थेट यष्टीवर आदळला. कमिन्सची ही अप्रतिम फेक चर्चेचा विषय ठरली. (वृत्तसंस्था)दुसºया डावात आम्ही चांगली फलंदाजी करू अशी आशा व्यक्त करीत पाच हजार धावा पूर्ण करणारा पुजारा म्हणाला,‘मी प्रथम श्रेणी क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळत असल्यामुळे मला पुरेसा अंदाज आलेला आहे. खेळपट्टी फटकेबाजीसाठी उपयुक्त नसल्याने कमकुवत चेंडूची वाट पाहावी लागत होती. तळाच्या फलंदाजांसोबत खेळताना ते किती साथ देतील याची शंका असते. यामुळेच मी फटकेबाजीही करीत राहिलो.’ धावबाद होण्याबद्दल विचारताच तो म्हणाला,‘स्ट्राईक स्वत:कडे ठेवण्याच्या इराद्याने धावलो. मी जोखिम पत्करली, त्याचवेळी कमिन्सची फेक अप्रतिम होती. ’ परिस्थिती पाहता २५० धावा चांगल्या आहेत, या शब्दात त्याने संघाच्या कामगिरीचे समर्थन केले.>आघाडीच्या फळीकडून अपेक्षापहिल्या दिवसाचा ‘महानायक’ ठरलेला शतकवीर चेतेश्वर पुजारा याने आघाडीच्या फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.सलामीच्या फलंदाजांनी निराश केल्यानंतर पुजाराने एक टोक समर्थपणे सांभाळले. दुसºया टोकाहून ज्या पद्धतीने भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाले ते पाहता, सहकाºयांनी जबाबदारीने खेळायला हवे होते असे मत पुजाराने व्यक्त केले.पुजारा म्हणाला, ‘आम्हीही जबाबदारीने खेळायला हवे होते. मला संयम राखायचा आहे, मी केवळ आवाक्यातील चेंडूच टोलवणार, असे ठरविले होते. यजमान अचूक मारा करत असल्याने आघाडीच्या फलंदाजांनीही अधिक जबाबदारी दाखवायला हवी होती. आजच्या चुकीतून सहकारी धडा घेतील.’दुसºया डावात दहा महिन्यांनी कसोटी सामन्यात पुनरागमन करणाºया ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या खेळीवर सर्वांच्या नजरा होत्या. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती आणि त्याने तशी सुरुवातही केली. २ षटकार ठोकून त्याने संघाच्या आशा उंचावल्या. मात्र, अतिआक्रमकता नडल्याने त्याला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही.आजची शतकी खेळी कसोटीतील माझ्या अव्वल पाचपैकी एक आहे. लोक नेहमी म्हणतात, की मी भारतात अधिक धावा काढतो. पण भारतात आम्ही किती सामने खेळतो हे पहावे लागेल. भारतात अधिक सामने खेळत असू तर स्वाभाविकपण धावादेखील अधिक निघतील. विदेशात हे माझे दुसरे शतक आहे.- चेतेश्वर पुजारा>धावफलकभारत (पहिला डाव) : लोकेश राहुल झे. फिंच गो. हेजलवूड २,मुरली विजय झे. पेन गो. स्टार्क ११, चेतेश्वर पुजारा धावबाद (कमिन्स) १२३, विराट कोहली झे. ख्वाजा गो. कमिन्स ३, अजिंक्य रहाणे झे. हॅन्डस्कोम्ब गो. हेजलवूड १३, रोहित शर्मा झे. हॅरिस गो. लियोन ३७, ऋषभ पंत झे. पेन गो. लियोन २५, आर. अश्विन झे. हॅन्डस्कोम्ब गो. कमिन्स २५, ईशांत शर्मा त्रि. गो. स्टार्क ४, मोहम्मद शमी खेळत आहे ६, अवांतर १ ,एकूण ८७.५ षटकांत ९ बाद २५० धावा. गडी बाद क्रम: १/३, २/१५, ३/-१९, ४/४१, ५/८६, ६/१२७, ७/१८९, ८/२१०, ९/२५०. गोलंदाजी : मिशेल स्टार्क १९-४-६३-२, जोश हेजलवूड १९.५-३-५२-२, पॅट कमिन्स १८-३-४९-२, नॅथन लियोन २८-२-८३-२, हेड २-१-२-०.