गुवाहटी : सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी मैदानावर सल्लामसलत करताना आपण पाहतो. पण धोनीकडूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक अशी चूक झाली, ज्याच्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली असती. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला डीआरएस प्रणालीचा वापर न करणे चांगलच महागात पडलं आहे.
भुवनेश्वर कुमारच्या पाचव्या षटकातील एका चेंडूवर हेनरिक्स फलंदाजी करत असताना चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करुन धोनीच्या हातात गेला. यासाठी सर्व खेळाडूंनी अपील केले होते. पण हेनरिक्स बाद नसल्याचा निर्णय पंचांनी दिला. कर्णधार विराटने यानंतर तातडीने धोनीचा सल्ला घेतला. पण डीआरएसची गरज नसल्याचे धोनीने सांगितले. काही वेळानंतर हेनरिक्स बाद होता हे टीव्ही रिप्लेमध्ये दाखवल्यानंतर स्पष्ट झाल्यामुळे टीम इंडियाने डीआरएसचा वापर केला असता तर हेनरिक्सला माघारी परतावे लागले असते. त्यावेळी हेनरिक्स अवघ्या दोन धावांवर खेळत होता. जर हेनरिक्स बाद झाला असता तर चित्र वेगळं झालं असते. हेनरिक्सनं बाद होताच कांगारुंची टीम दबावात आली असती कारण वॉर्नर-फिंच जोडी याआधीच माघारी गेली होती. सलामी जोडी झटपट परतल्यानंतर मोझेस हेन्रिक्स (६२*) आणि ट्रॅव्हिस हेड (४८*) यांनी तिसºया विकेटसाठी केलेल्या नाबाद १०९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुस-या टी-२० सामन्यात भारताचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव केला.
हेनरिक्सने ऑस्ट्रेलियाच्या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने केवळ २ धावांवर मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत नाबाद 62 धावांची खेळी केली. हेनरिक्सच्या या खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या विजयाबरोबरच मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून शुक्रवारी होणा-या अखेरच्या टी-२० सामन्याला आता अंतिम सामन्याचे स्वरूप आले आहे.
Web Title: India's defeat due to this mistake of Dhoni?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.