Join us  

भारताचा निर्विवाद वर्चस्वाचा निर्धार; विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून

विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 5:24 AM

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात गुरुवारपासून येथे दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. उभय संघात होणारी ही शंभरावी कसोटी असेल. 

रोहित अँड कंपनीला विजयी वर्चस्व गाजविण्याची संधी असताना उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडूनही मोठी खेळी अपेक्षित असेल. या मालिकेनंतर भारतीय संघ  डिसेंबर-जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. त्यामुळे रहाणेला येथे अखेरची संधी असेल. रहाणे विंडीजविरुद्ध अपयशी ठरला होता. दुसऱ्या कसोटीतही भारताला एकदाच फलंदाजीची संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. द. आफ्रिका दौऱ्याआधी श्रेयस अय्यरही तंदुरुस्त होऊ शकतो. तसेच, विराट कोहलीचा हा पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार असल्याने त्याच्या खेळीवरही सर्वांची नजर असेल.

५०० सामने खेळलेले दिग्गज (भारत-वेस्ट इंडिज)

    खेळाडू    सामने    धावा    सरासरी    शतके    बळी     सचिन तेंडुलकर (भारत)    ६६४    ३४३५७    ४८.५२    १००    २०१    माहेला जयवर्धने (श्रीलंका)    ६५२    २५९५७    ३९.१५    ५४    १४    कुमार संगकारा (श्रीलंका)    ५९४    २८०१६    ४६.७७    ६३    ००    सनथ जयसूर्या (श्रीलंका)    ५८६    २१०३२    ३४.१४    ४२    ४४०    रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)    ५६०    २७४८३    ४५.९५    ७१    ०८    महेंद्रसिंग धोनी (भारत)    ५३८    १७२६६    ४४.९६    १६    ०१    शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान)    ५२४    १११९६    २३.९२    ११    ५४१    जॅक कॅलिस (द. आफ्रिका)    ५१९    २५५३४    ४९.१    ६२    ५७७    राहुल द्रविड (भारत)     ५०९    २४२०८    ४५.४१    ४८    ०५

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ
Open in App