मुंबई : भारताला सक्रीय ठेवण्यासाठी उबर नेटवर्कचे सुमारे अर्धा दशलक्ष भागीदार दर आठवड्याला लाखो लोकांना त्यांच्या इच्छुक स्थळी पोचवतात. ह्या खेळीत आज आणखी एक भागीदार सामील झाला आहे. शहरी गतीशीलतेची जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या उबर रायडिंग अॅपने भारतातील पहिले ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. एशिया पॅसिफिक विभागातील ही ह्या प्रकारची पहिलीच घटना असेल. या भागीदारीतून उबर व विराट कोहली हे, येत्या काही वर्षांमध्ये नागरिक व समुदायांचे सशक्तीकरण करण्याच्या सामाईक दृष्टिकोनातून देशात अब्जावधी डॉलर्सची सेवा पुरवण्याचे उबरचे वचन अधोरेखित करताना दिसतील.
या प्रसंगी बोलताना उबर इंडिया आणि एसए अध्यक्ष अमित जैन म्हणाले, “उबर इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून विराट कोहली यांची निवड व्हावी याचा आम्हांला अतिशय आनंद आहे. भारताबद्दल त्याची ऑन अँड ऑफ फिल्ड बांधिलकी प्रशंसनीय आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने देशाला जागतिक नावलौकिक प्राप्त करून देण्यापासून ते समाजात वेगळे स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने त्याने गुंतवणूक केलेली आहे. देशाला सेवा पुरवण्याची बांधिलकी जपत असताना, दरदिवशी देशभरात आम्ही जी ऊर्जा निर्माण करतो त्याचप्रकारची ऊर्जा असलेले व्यक्तिमत्त्व आम्हला विराट कोहली यांच्या रुपाने गवसले आहे. युथ आयकॉन म्हणून विराट कोहली आपल्या हेतू व सार्वत्रिकतेचे जे प्रतिनिधित्व करतो ते देशाला पुढे नेणाऱ्या आमच्या प्रवासाचा मार्ग आखण्यास मदत करेल.”
उबरशी जोडले जाण्याविषयी बोलताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाले, “क्रिकेटपटू म्हणून मी बरेच प्रवास करतो आणि उबर बुक करण्याचा अनुभव मी स्वतः अनुभवतो आहे.लोकांना शहराकडे वळवण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्यासाठी ही कंपनी तंत्रज्ञानाचा वापर करतेय आणि आर्थिक संधी निर्माण करून लाखो लोकांना सक्षम बनते हे पाहणे आनंददायी आहे.जिथे काम करतात त्या शहराशी व लोकांशी बांधिलकी जपणाऱ्या अशा कंपनीशी हात मिळवण्यास मी उत्सुक आहे”.
२०१८ मध्ये ब्रँड लेड इंटरवेन्शनची घोषणा करण्यासाठी उबर इंडियाचे विराट कोहलीसोबत जोडले जाणे म्हणजे पायाभरणीच असेल. विराट आता या ब्रँडचा चेहरा असून उबर इंडियाने सुरू केलेल्या नवीन विपणन आणि ग्राहक अनुभव मोहिमेत पुढाकार घेत विराट सक्रियपणे सहभागी होईल.
“विराट गतिशीलता, एकनिष्ठता, हिंमत, क्षमता याचे प्रतिनिधित्व करतात. ते जगाच्या व्यासपीठावरील भारतीय ध्येयाचा अवतार आहेत. अब्जावधी आकांक्षाचा दुवा आहेत, लोकांना आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी करणारे आहेत. जगभरातील नागरिकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि ध्येय यात समतोल साधल्यानेच उबरची भारताप्रति असलेल्या बांधिलकीची जाणीव असलेला परफेक्ट पार्टनर म्हणून ते योग्य ठरतात”, असे उबर इंडिया अँड साउथ एशियाचे मार्केटिंग हेड संजय गुप्ता यांनी सांगितले.