ठळक मुद्दे२०११-१२च्या इंग्लंड दौऱ्यावर कौंटी टीमच्या फिटनेस प्रोग्राममध्ये भारतीय खेळाडू नापास झाले होते.विराटही त्या दौऱ्यावर संघासोबत होता, परंतु त्याला एकही सामना खेळता आला नाही.
भारतीय संघ मागील काही वर्षांपासून फिटनेसवर जास्त लक्ष देत आहे. टीम इंडियात स्थान पटकावण्यासाठी फक्त क्रिकेट सामन्यातील कामगिरीच पुरेशी नाही, आता खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागत आहे. त्यात अपयशी ठरणऱ्या खेळाडूला संघात स्थानही दिले जात नाही. वरूण चक्रवर्थी ( Varun Chakravarthy) हे त्ेयाचं ताजं उदाहरण आहे. आयपीएल २०२०तील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवड झाली होती, पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. आता सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही त्याची निवड झाली, परंतु BCCIच्या नवीन २ किमी धावण्याच्या टेस्टमध्ये तो अपयशी ठरला. आता त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले गेले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो पोस्ट करून वीरेंद्र सेहवाग म्हणतो, तुम्ही घाबरू नका
टीम इंडियाच्या फिटनेसच्या क्रांतीमागे कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचं मुख्य योगदान आहे. त्यानं स्वतःला फिट ठेवताना संघनिवडीत फिटनेसचं महत्त्व पटवून दिलं. आता टीम इंडियाच्या या फिटनेसमागे इंग्लंडचा हात असल्याचा दावा करताना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) मजेशीर किस्सा सांगितला. फिटनेसच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली जाणार नाही, हे विराटनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच युवराज सिंगसारख्या स्टार खेळाडूलाही संघाबाहेर बसावं लागलं होतं. लोकेश राहुलला संधी देण्यासाठी विराट कोहली आज कुणाला डच्चू देणार, Playing XI कशी असणार?
टीम इंडियात पदार्पण करताना विराटही फिटनेसच्या बाबतीत तितका आग्रही नव्हता, परंतु काळासोबत त्यानं स्वतःला बदललं. त्याच्या या बदलामागे अनेक कारणं आहेत. पण, सेहवागनं सांगितलेला हा किस्सा कधी ऐकला नसावा. २०११-१२च्या इंग्लंड दौऱ्यावर कौंटी टीमच्या फिटनेस प्रोग्राममध्ये भारतीय खेळाडू नापास झाले होते. जसप्रीत बुमराहला खराब कामगिरीनंतरही जाब विचारला जात नाही; मोहम्मद आमीरनं अंतर्गत वादात भारतीय गोलंदाजाला खेचले!
''२०११-१२मध्ये मी अखेरचा इंग्लंड दौरा केला होता आणि त्यात दोन कसोटी सामने खेळले होते. तेथे सर्व कौंटी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये चार्ट असायचा आणि त्यावरून खेळाडूचा फिटनेस स्टँडर्ड ठरवला जायचा. तिथूनच सध्याच्या भारतीय संघाला फिटनेस स्टँडर्डचं महत्त्व पटलं असावं. त्या दौऱ्यावर जेव्हा आम्ही फिटनेस स्टँडर्ड पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निम्माहून अधिक संघ अपयशी ठरला होता,''असे वीरूनं क्रिकबजशी बोलताना सांगितले. सचिनचे अर्धशतक, युवराजची आतषबाजी; लाराची वादळी खेळी अन् ४० षटकांत ४२४ धावा
विराटही त्या दौऱ्यावर संघासोबत होता, परंतु त्याला एकही सामना खेळता आला नाही. तिथूनच विराटनं फिटनेसचा मंत्र स्वीकारला असावा, असे वीरूला वाटते.
Web Title: India's fitness standards picked from England? Sehwag makes an interesting claim about Team India's fitness
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.