50 Not Out...! वाढदिवशी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चाहत्यांकडून 'प्रेमाचा' वर्षाव

Happy Birthday Sachin Tendulkar : महान क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:39 PM2023-04-24T12:39:06+5:302023-04-24T12:39:43+5:30

whatsapp join usJoin us
India's great cricketer Sachin Tendulkar has made a special post on his 50th birthday | 50 Not Out...! वाढदिवशी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चाहत्यांकडून 'प्रेमाचा' वर्षाव

50 Not Out...! वाढदिवशी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चाहत्यांकडून 'प्रेमाचा' वर्षाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

sachin tendulkar 50th birthday । सिंधुदुर्ग: भारताचा महान क्रिकेटपटू क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटला नवीन ओळख देणारा आणि भारतीयांचे दैवत अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. आपल्या सर्वांचा लाडका सचिन आज ५० वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतली. या गोष्टीलाही आता दहा वर्ष होत आली. पण तरीही त्याने त्याची प्रतिमा आणि चाहतावर्ग अद्यापही तसाच राखण्यात यश मिळवले आहे. निवृत्तीनंतर त्याचा चाहतावर्ग कमी झालेला नाहीच, उलट सचिनच्या नवनव्या गोष्टींमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भरच पडताना दिसते. क्रिकेटमध्ये ४०व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सचिनने २४ वर्षे क्रिकेट खेळले आणि समृद्ध अशी कारकीर्द घडवली. सचिनचे रेकॉर्ड पाहिले की प्रत्येक भारतीय सचिनला साष्टांग दंडवत घालूनच त्याचे आभार मानू शकतो. क्रिकेटच्या देवाने देखील वाढदिवशी एक खास पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, सचिन आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात अर्थात कोकणात गेला आहे. तेथील त्याने एक फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. सचिनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "चहाची वेळ, ५० नाबाद." 

खरं तर भारतीयांची शान असलेल्या सचिनवर काल रात्री बारा वाजल्यापासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन स्वत: आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच कोकणात गेला आहे. सचिन आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात असून तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी साजरा करत आहे. सचिन रविवारी दुपारी मित्रांसमवेत गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला. तेथील भोगवे समुद्रकिनारी फेरफटका मारताना तो अनेकांना दिसला. भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन आपला ५०वा वाढदिवस साजरा करणार असल्याचे बोलले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: India's great cricketer Sachin Tendulkar has made a special post on his 50th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.