Join us  

दुखापतग्रस्त गुप्टिल भारताविरुद्ध ‘आऊट’

न्यूझीलंडचा सीनिअर सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टिल पाठीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या आगामी टी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे न्यूझीलंडने स्पष्ट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:02 AM

Open in App

वेलिंग्टन : न्यूझीलंडचा सीनिअर सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टिल पाठीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या आगामी टी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे न्यूझीलंडने स्पष्ट केले आहे. गुप्टिलच्या स्थानी अष्टपैलू जिमी निशामला संघात स्थान दिले आहे. तो भारताविरुद्ध पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन लढतीत खेळला होते.न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की, ‘दुर्दैवाने मार्टिन या टी-२० मालिकेसाठी वेळेवर दुखापतीतून सावरलेला नाही. मालिकेत पाच दिवसांमध्ये तीन सामने खेळले जाणार आहेत. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आमच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो दुखापतीतून लवकर सावरेल, अशी आशा आहे.’गुप्टिलला भारताविरुद्ध अखेरच्या वन-डे आंतरराष्ट्रीय लढतीपूर्वी दुखापत झाली होती. आता तो बांगलादेशविरुद्ध पुढील आठवड्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेत पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला वेलिंग्टनमध्ये ६ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. दुसरा सामना ८ फेब्रुवारीला, तर अंतिम सामना १० फेब्रुवारीला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड