India’s ICC ODI World Cup team finalised - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) राष्ट्रीय निवड समितीने शनिवारी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जवळपास ठरवला आहे. १५ जणांचा सहभाग असलेल्या या संघात लोकेश राहुलने ( KL Rahul) स्थान पटकावले आहे, तर संजू सॅमसनला डच्चू मिळाला आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर श्रीलंकेत दाखल झाले आणि त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली आणि अंतिम संघ ठरवला. भारत-पाकिस्तान यांच्यातली लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर ही बैठक झाली.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सॅमसनसह, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा हे सध्या आशिया चषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघासोबत आहेत, त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळालेलं नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या मधल्या फळीने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवली. विशेषतः इशान किशनने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. रोहितसह शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव हे वर्ल्ड कप संघाचे सदस्य असतील.
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची ५ सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे आणि बीसीसीआय आज किंवा उद्या संघाची अधिकृत घोषणा करतील. राहुलला मधल्या फळीसह यष्टिरक्षकाची भूमिकाही बजावावी लागणार आहे.
८ ऑक्टोबर - भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्ता, दिल्ली१४ ऑक्टोबर- भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे२२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड, धर्मशाला२९ ऑक्टोबर - भारत वि. इंग्लंड, लखनौ२ नोव्हेंबर - भारत वि. श्रीलंका, मुंबई५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता१२ नोव्हेंबर- भारत वि. नेदरलँड्स, बंगळुरू