Join us  

MS धोनीची सवंगड्यांसोबत धाब्यावर पार्टी; मग चर्चा तर होणारच!

कॅप्टन कूल धोनी आपल्या जुन्या सवंगड्यांसोबत धाब्यावर जेवण करताना स्पॉट झाला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 11:09 AM

Open in App

भारतीय संघाची माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंगचा स्टार महेंद्रसिंह धोनी या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची क्रेझ कायम आहे. धोनी स्वत: सोशल मीडियावर फारसा सक्रीय दिसत नाही. पण अनेकदा त्याचा साधेपणा सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरतो. यात आता धोनीच्या धाब्यावरील पार्टीच्या फोटोची भर पडली आहे. कॅप्टन कूल धोनी आपल्या जुन्या सवंगड्यांसोबत धाब्यावर जेवण करताना स्पॉट झाला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

मित्रांसोबत पार्टी, छोट्या चाहत्यासोबत सेल्फी

भारतीय संघाला दोन वर्ल्ड कपसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या माजी कर्णधारानं विकेंडमध्ये आपल्या जुन्या मित्रांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड केल्याचे या फोटोतून दिसून येते. धोनीसह या फोटोत १४ अन्य लोक दिसत आहेत. ही मंडळी धोनीच्या खास फ्रेंड्स सर्कलमधील आहेत, अशीही चर्चा रंगताना दिसते. याशिवाय धोनीनं यावेळी एका छोट्या फॅनसोबतही सेल्फी काढल्याचे दिसून आले. 

धोनीची झलक "सबसे अलग"  

महेंद्रसिंह धोनीनं क्रिकेटच्या मैदानातील आपल्या कूल अंदाजानं मोठा चाहता वर्ग कमावला आहे. क्रिकेटच्या मैदानात आपल्या आश्चर्यकारक निर्णयामुळे चाहत्यांना चकीत करुन सोडणारा धोनी सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटरपैकी एक आहे. अफलातून यश आणि तुफान लोकप्रियता मिळाली असली तरी स्टारडम बाजूला ठेवून तो सामान्य अंदाजानं पुन्हा पुन्हा आपल्या चाहत्यांचे मन जिंकतो. व्हायरल फोटोमध्ये पुन्हा एकदा त्याची झलक दिसून येते.  

चाहत्यांना कधीच करत नाही निराश

बाईकवरील बिनधास्त राईड असो किंवा अलिशान कारमधून अगदी बनियान घालून फिरण्याचा त्याचा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावल्याचे याआधीही पाहायला मिळाले आहे. एवढेच नाही तर एखाद्या चाहत्याने ऑटोग्राफ किंवा सेल्फीची विनंती केली तर तो अगदी सहजरित्या त्यांची इच्छा पूर्ण करतो. धाब्यावरील व्हायरल फोटोंमध्ये छोट्या फॅनसोबतचा त्याचा फोटो त्याच्या या खास स्वभावाचा पुरावा आहे.

 

टॅग्स :ऑफ द फिल्डमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ