इंदोर : सलग सात कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर विराटने केलेले द्विशतक असो किंवा वीरेंद्र सेहवागची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च खेळी. येथील होळकर स्टेडियम भारतीय कर्णधारांसाठी नेहमीच लकी ठरले आहे.विराट कोहली २०१६ मध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र, कसोटीमध्ये अचानक त्याच्या फलंदाजीची लयच बिघडली. सात कसोटीत त्याला १८.८५च्या सरासरीने फक्त १३२ धावा करता आल्या. येथील मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत कोहलीने २११ धावांची खेळी केली. भारताने हा सामना ३२१ धावांनी जिंकला होता.येथे शतक झळकावत रिकी पाँटिंगच्या ३० शतकांचा विक्रम मोडण्यावर विराटचे लक्ष असेल. येथे झालेला एकमेव कसोटी सामना व सर्व एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकली आहे.येथे २००६ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. राहुल द्रविड याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडवर सात गड्यांनी मात केली होती. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडवरच ५४ धावांनी विजय मिळवला होता. २०११ मध्ये झालेल्या सामन्यात वीरेंद्र सेहवागने १४९ चेंडूंत २५ चौकार व सात षटकारांच्या साह्याने २१९ धावा केल्या होत्या. येथे झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. कर्णधार धोनीने येथे ९२ धावा केल्या होत्या, तर तीन झेल व एक यष्टीचित करण्यात यश मिळविले. (वृत्तसंस्था)>येथे चालणार फिरकीची जादूपहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात आपल्या फिरकीच्या जाळ्यात आॅस्ट्रेलियाला पकडणाºया यजुर्वेद चहल व कुलदीप यादव यांची जादू तिसºया सामन्यातही चालणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देईल, असा अंदाज क्यूरेटरने व्यक्त केला आहे.चहल व कुलदीपने आतापर्यंत दोन सामन्यांत प्रत्येकी पाच बळी घेतले आहेत. कुलदीपने दुसºया एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेतली. त्याच्या कामगिरीमुळेच कमी धावसंख्या असतानाही भारताने आॅस्ट्रेलियावर ५० धावांनी विजय संपादन केला.मध्यप्र्रदेश क्रिकेट संघटनेचे क्यूरेटर समंदरसिंग चौहान म्हणाले, ‘ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल. परंपरागत फिरकीपटूंना येथे मदत मिळणार नाही. मात्र, मनगटाद्वारे फिरकी करणाºया गोलंदाजांना मदत मिळू शकते.>भारतीय कर्णधार विराट कोहलीने मागील दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. होळकर स्टेडियमवर झालेल्या चारही एकदिवसीय सामन्यावेळी भारताने नाणेफेक जिंकली होती. चौैहान म्हणाले, ‘येथे प्रथम फलंदाजी घेणे फायद्याचे असणार आहे. खेळ पुढे जाईल तसे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देईल.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- हे मैदान भारतीय कर्णधारांसाठी ‘लकी’..., राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात भारताची चमकदार कामगिरी
हे मैदान भारतीय कर्णधारांसाठी ‘लकी’..., राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात भारताची चमकदार कामगिरी
सलग सात कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर विराटने केलेले द्विशतक असो किंवा वीरेंद्र सेहवागची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च खेळी. येथील होळकर स्टेडियम भारतीय कर्णधारांसाठी नेहमीच लकी ठरले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 3:43 AM