Join us  

विराट ठरला सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार, धोनीला मागे टाकले

कसोटी क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 4:47 AM

Open in App

किंग्स्टन : वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत २५७ धावांनी नमवून कर्णधार विराट कोहली याने महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनला. विराटच्या नेतृत्वात भारताचा हा २८ वा विजय होता. कोहलीने ४८ पैकी २८ सामने जिंकले. धोनीच्या नेतृत्वात भारताने ६० पैकी २७ सामने जिंकले आहेत. सौरव गांगुली (२१ विजय) आणि मोहम्मद अझहरुद्दीन (१४ विजय) हे क्रमश: तिसºया आणि चौथ्या स्थानावर आहेत.

द. आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ हा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून त्याने ५३ तर आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने ४८ कसोटी सामने जिंकले आहेत. भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत १२० गुणांसह अव्वल स्थान मिळविले. रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने सोमवारी दुसºया व अंतिम कसोटीत वेस्ट इंडिजला २५७ धावांनी पराभूत करत कसोटी मालिका २-० अशी जिंकली. भारताने विजयासाठी दिलेल्या ४६८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ५९.५ षटकात २१० धावांत गुंडाळला. भारताकडून रवींद्र जडेजा व मोहम्मद शमीने प्रत्येकी तीन, ईशांत शर्माने दोन बळी घेतले.

भारताने दिलेल्या ४६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव लवकर गुंडाळणार असे वाटत असतानाच ब्रुक्स व ब्लॅकवूड यांनी डाव सावरला. विंडीजने दिवसाची सुरुवात दोन बाद ४५ या धावसंख्येवरुन केली. विंडीजने सकाळी भारताला लवकर यश मिळवू दिले नाही. ब्राव्हो दुखापतीमुळे बाहेर गेल्याने विंडीजने नव्या नियमानुसार ब्लॅकवूडला मैदानात उररवले. ब्लॅकवूडने ७२ चेंडूत ३८ धावा केल्या. बुमराहने त्याचा अडथळा दूर केला. बु्रक्सने चांगलीच झुंज देताना ११९ चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कोहलीने त्याला धावबाद केले. त्यानंतर लगेचच हॅमिल्टनला (०) जडेजाने तंबूत पाठवले. जेसन होल्डरला (३९ ) जडेजानेच बाद करत भारताचा विजय निश्चित केला.विहारीमुळे ड्रेसिंग रुमचे बळ वाढतेहनुमा विहारी फलंदाजी करीत असताना ड्रेसिंग रुममध्ये बळ निर्माण होते, या शब्दात कर्णधार विराट कोहलीने त्याचे कौतुक केले. विहारीबाबत विराट म्हणाला,‘ फलंदाजी करताना विहारीमध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवतो. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये निश्चिंत होऊन त्याचा खेळ पाहू शकतो.’स्मिथने टाकले कोहलीला मागेदुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली हा आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत नंबर वनवरून पायउतार झाला असून त्याचे स्थान आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ याने घेतले. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह तिसºया स्थानी आला आहे.जमैका कसोटीत पहिल्या चेंडूवर बाद झालेला कोहली दुसºया स्थानावर घसरला. स्मिथने इंग्लंडविरुद्ध पहिल्या अ‍ॅशेस कसोटीत दोन शतके ठोकली शिवाय दुसºया सामन्यात त्याने ९२ धावांची खेळी केली होती. अजिंक्य रहाणेने सातवे, तर हनुमा विहारीने ३० वे स्थान मिळवले. बुमराह कसोटीत तिसºया स्थानी असला तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो नंबर वन आहे. कसोटीत आॅस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि द. आफ्रिकेचा कासिगो रबाडा हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसºया स्थानावर आहेत. अष्टपैलू यादीत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर अव्वल स्थानी आहे.‘बुमराह विश्व क्रिकेटमधील सर्वांत परिपूर्ण गोलंदाज’च्‘जसप्रीत बुमराह विश्व क्रिकेटमधील सर्वांत परिपूर्ण गोलंदाज बनला असून स्वत:मधील शिस्तीच्या बळावर त्याने टी२० स्पेशालिस्ट हा ठपकाही पुसून टाकला. आता तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तितकाच प्रभावी वाटतो,’ या शब्दात कर्णधार विराट कोहलीने बुमराहचे कौतुक केले. बुमराहला सुरुवातीला टी२० स्पेशालिस्ट गोलंदाज मानले जात होते.च् विंडीजविरुद्ध दुसºया कसोटीत भारताला २५७ धावांनी विजय मिळाल्यानंतर कोहली म्हणाला, ‘बुमराह विशिष्ट कोपºयातून चेंडू टाकतो. चेंडूत स्विंग व वेग असल्याने भलेभले फलंदाज चकित होतात. माझ्यामते विश्व क्रिकेटमधील तो सर्वात परिपूर्ण गोलंदाज ठरतो. त्याने टी२० सोबतच एकदिवसीय व कसोटी या तिन्ही प्रकारांवर निर्माण केलेले वर्चस्व पाहून आनंद होतो.’च्कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक साधणारा बुमराह तिसरा भारतीय गोलंदाज बनला. यावर कोहली म्हणाला, ‘कर्णधार या नात्याने बुमराहचे संघातील स्थान हे आपले नशिब म्हणावे लागेल. जगात सर्वोत्कृष्ट गोलंदाज बनण्यासाठी त्याने आयुष्याला तसे वळण देखील दिले आहे. तो शिस्तबद्ध जगतो शिवाय आहाराकडे विशेष लक्ष देतो. त्याच्या चेंडूतील वेग आणि विविधतेचा सामना करणाºया गोलंदाजांबाबत मला विशेष सहानुभूती आहे.’

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय