India's new T20 Captain: ठरलं! हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार, रोहितबाबत विधान

India's new T20 Captain:  ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी होताना दिसतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:00 AM2022-11-18T10:00:18+5:302022-11-18T10:00:39+5:30

whatsapp join usJoin us
India's new T20 Captain: Hardik Pandya to be officially announced as ‘India’s new T20 Captain’ before series vs SriLanka, Rohit Sharma going OUT | India's new T20 Captain: ठरलं! हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार, रोहितबाबत विधान

India's new T20 Captain: ठरलं! हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार, रोहितबाबत विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India's new T20 Captain:  ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी होताना दिसतेय. रोहित शर्माचं वय पाहता त्याच्याकडे आता ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी कायम राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यात BCCI कडून हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार असेल, असे संकेत मिळत आहेत. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताची युवा ब्रिगेड न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि आज पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधीच बीसीसीआयकडून ही ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. २०२४मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी बीसीसीआय मर्यादित षटकांच्या या प्रकारात युवा खेळाडूंना पाहत आहे आणि त्यासाठी आतापासूनच त्यांनी कंबर कसली आहे. 

रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडवर कडाडले; IPLच्या वेळेस मिळते तेवढी विश्रांती पुरेशी मग...

InsideSports ने दिलेल्या माहितीनुसार  श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेआधीच हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची अधिकृत घोषणा केली जाईल. रोहित शर्माकडे वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व कायम ठेवले जाईल. भारतात पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत रोहितकडे वन डे संघाचे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सध्याच्या सर्कलपर्यंत कसोटीचे नेतृत्व कायम असेल. 

''पुढील आव्हानं लक्षात घेता आतापासूनच बदल करण्याची गरज आहे. रोहित शर्माकडे अजूनही भारतीय संघाला देण्यासाठी भरपूर आहे, असेच सर्वांना वाटते, परंतु त्याचवेळी त्याने आधीच बरंच काही योगदान दिले आहे. आणि एक गोष्ट तो आता युवा राहिलेला नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आतापासूनच तयारीला लागायला हवं. हार्दिक हा ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी सक्षम पर्याय आहे. लवकरच निवड समितीची बैठक होईल आणि हार्दिक हा भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार असेल, अशी घोषणा होईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

रोहित शर्माला याबाबत सांगण्यात आले आहे का किंवा रोहितने त्याचा निर्णय़ घेतलाय का, याबाबत बीसीसीआयने सांगितले की,''अद्याप नाही. ते नुकतेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळून परतले आहेत. लवकरच आम्ही मुख्य प्रशिक्षक, कर्णधारांसोबत बैठक करू आणि याबाबत चर्चा करू.''

दरम्यान माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि  प्रभारी प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मण यांनीही हार्दिकच्या ट्वेंटी-२० कर्णधारपदासाठी पाठिंबा दर्शवीला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: India's new T20 Captain: Hardik Pandya to be officially announced as ‘India’s new T20 Captain’ before series vs SriLanka, Rohit Sharma going OUT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.