Join us  

भारताच्या 'या' खेळाडूला पकडणं आहे कठीण, विराट कोहलीचा खुलासा

सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:41 AM

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक सामना पार पडला. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खुलासा केला आहे. भारताच्या एका खेळाडूला पकडणं कठिण आहे, असे वक्तव्य कोहलीने सामना संपल्यावर केले आहे.

कोहली म्हणाला की, " खेळाडूसाठी तंदुरुस्ती महत्वाची असते. तंदुरूस्तीसाठी आम्ही सराव करतो. पण सरावामध्ये एका खेळाडूला पकडणं सोपं नाही आणि तो खेळाडू आहे रवींद्र जडेजा. कारण जडेजा ज्यापद्धतीने सराव करतो, त्याला तोड नाही."

भारताने गुलाबी चेंडूच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा एक डाव ४६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.बांगलादेशने रविवारी ६ बाद १५२ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना डावाने पराभव टाळण्यासाठी ८९ धावांची गरज होती. भारताने ५० मिनिटांपेक्षा कमी वेळेत विजयाची औपचारीकता पूर्ण केली. विशेष म्हणजे, सलग चौथ्यांदा डावाने विजय मिळवणारा भारत पहिला संघ ठरला.मुशफिकूर रहीमचा (७४) अपवाद वगळता बांगलादेशचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. बांगलादेशचा दुसरा डाव ४१.१ षटकात १९५ धावात संपुष्टात आला. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावात आटोपला होता. या मालिकेत सलग दुसरी लढत ३ दिवसात संपली. २-० असा शानदार विजय मिळवताना भारताने १२० गुणांची कमाई करीत जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत अघाडी कायम राखली.मुशफिकूरने वैयक्तिक ५९ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्याने आक्रमक पवित्रा घेताना ईशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले. उमेश यादवने मुशफिकूरला माघारी परतवले. त्याचा फसलेला फटका जडेजाच्या हातात विसावला. त्याने १६ चौकार लगावले. महमुदुल्लाह (३९) रिटायर्ड हर्ट झाला होता. तो फलंदाजीसाठी आला नाही. यादवने त्यानंतर अल अमीन हुसेनला यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडत भारताचा विजय निश्चित केला. यादवने दुसऱ्या डावात ५३ धावांत ५ बळी घेतले. त्याने या लढतीत ८१ धावांत ८ बळी घेतले. शमीने पहिल्या डावात ३६ धावांत २ बळी घेतले होते, पण दुसºया डावातही त्याने आपल्या तिखट माºयाच्या जोºयावर पाहुण्या संघावर वर्चस्व कायम राखले. ईशांतने या लढतीत ७८ धावांत ९ बळी (दुसºया डावात ५६ धावात ४) घेतले. (वृत्तसंस्था)

सामन्यातील धावफलक

बांगलादेश (पहिला डाव) : ३०.३ षटकात सर्वबाद १०६ धावा.भारत (पहिला डाव) : ८९.४ षटकात ९ बाद ३४७ (डाव घोषित).बांगलादेश (दुसरा डाव) : शादमान इस्लाम पायचित गो. ईशांत ०, इमरुल कायसे झे. कोहली गो. ईशांत ५, मोमिनुल हक झे. साहा गो. ईशांत ०, मोहम्मद मिथुन झे. शमी गो. यादव ६, मुशफिकूर रहीम झे. जडेजा गो. यादव ७४, महमुदुल्लाह रिटायर्ड हर्ट ३९, मेहदी हसन मिरास झे. कोहली गो. ईशांत १५, ताईजुल इस्लाम झे. रहाणे गो. यादव ११, इबादत हुसेन झे. कोहली गो. यादव ०, अल अमीन हुसेन झे. साहा गो. यादव २१, अबू जायेद नाबाद २. अवांतर (२२). एकूण ४१.१ षटकांत सर्वबाद १९५ धावा. बाद क्रम : १-०, २-२, ३-९, ४-१३, ५-१३३, ६-१५२, ७-१५२, ८-१८४, ९-१९५.गोलंदाजी : ईशांत शर्मा १३-२-५६-४,उमेश यादव १४.१-१-५३-५, मोहम्मद शमी ८-०-४२-०, रविचंद्रन अश्विन ५-०-१९-०, रवींद्र जडेजा १-०-८-०. 

टॅग्स :विराट कोहलीरवींद्र जडेजा