India’s preparations for ODI World Cup 2023 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी केलेले प्रयोग अपयशी ठरले आणि त्यात दुखापतीचे ग्रहण लागल्याने टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. आता भारतीय संघाला घरच्या मैदानावर होणारा वन डे वर्ल्ड कप २०२३ खुणावत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्यापूर्वी भारतीय संघ २१ वन डे सामने खेळणार आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाने ४४ खेळाडूंची चाचपणी केली आणि आता त्यापैकी ३१ खेळाडू अजूनही शर्यतीत आहेत. यापैकी १४ खेळाडू हे शिखर धवनच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर खेळत आहेत. रोहित शर्मा बांगलादेश दौऱ्यावर पुनरागमन करणार आहे.
२०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताने सर्व लक्ष ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर केंद्रीत केले होत. त्यामुळेच मागील साडेतीन वर्षांत भारतीय संघ ३९ वन डे सामने खेळला आहे. या कालावधीत भारताचे ६ खेळाडूच २० पेक्षा अधिक वन डे सामने खेळले. तरीही भारतीय संघ अजूनही तगडा १५ जणांचा संघ निवडीपासून दूर आहेच. वर्ल्ड कपनंतर १३ मालिकांमध्ये ४४ खेळाडूंना संधी दिली गेली आणि त्यामध्ये धवन हा ३०पेक्षा जास्त सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.
अव्वल स्थानासाठी स्पर्धा
- रोहित शर्मा ( १७ डाव, ७१८ धावा, सरासरी ४८)
- लोकेश राहुल ( ११ डाव, ६०३ धावा, सरासरी ६७)
- शिखर धवन ( २९ डाव, ११९२ धावा, सरासरी ४६ )
- शुबमन गिल ( १० डाव, ५६३ धावा, सरासरी ७० )
- विराट कोहली ( २४ डाव, १०४२ धावा, सरासरी ४५)
- इशान किशन ( ८ डाव, २६७ धावा, सरासरी ३३)
- पृथ्वी शॉ ( ६ डाव, १८९ धावा, सरासरी ३२)
मधली फळी
- लोकेश राहुल ( जर तो सलामीला आला नाही )
- सूर्युकमार यादव ( १२ डाव, ३४० धावा, सरासरी ३४)
- संजू सॅमसन ( ९ डाव, २९४ धावा, सरासरी ७४)
- रिषभ पंत ( १५ डाव, ६१३ धावा, सरासरी ४४)
- श्रेयस अय्यर ( २२ डाव, ९२८ धावा, सरासरी ४९)
- राहुल त्रिपाठी ( अद्याप पदार्पण नाही )
- रजत पाटीदार ( अद्याप पदार्पण नाही )
अष्टपैलू खेळाडू
- हार्दिक पांड्या ( १२ सामने, ४२९ धावा, ९ विकेट्स)
- वॉशिंग्टन सुंदर ( ५ सामने, ५७ धावा, ७ विकेट्स)
- अक्षर पटेल ( ६ सामने, ९२ धावा, ८ विकेट्स)
- दीपक हुडा ( ८ सामने, १४१ धावा, ३ विकेट्स)
- शार्दूल ठाकूर ( २२ सामने, २३५ धावा, ३३ विकेट्स)
- शाहबाज अहमद ( २ सामने, ३ विकेट्स)
फिरकीपटू
- आर अश्विन ( २ सामने, १ विकेट)
- युजवेंद्र चहल ( १८ सामने, ३४ विकेट्स)
- कुलदीप यादव ( २१ सामने, २५ विकेट्स)
- वॉशिंग्टन सुंदर ( ५ सामने, ७ विकेट्स)
जलदगती गोलंदाज
- जसप्रीत बुमराह ( १४ सामने, १८ विकेट्स)
- मोहम्मद शमी ( १५ सामने, २५ विकेट्स)
- दीपक चहर ( ८ सामने, १४ विकेट्स)
- अर्शदीप सिंग ( आजच पदार्पण केले)
- प्रसिद्ध कृष्णा ( १४ सामने, २५ विकेट्स)
- शार्दूल ठाकूर ( १५ सामने, २५ विकेट्स)
- उम्रान मलिक ( आजच पदार्पण)
- मोहम्मद सिराज ( १२ सामने, १८ विकेट्स)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"