Join us  

काय थट्टा लावली! दोन तासांत भारताचा संघ 'अव्वल'वरून झाला दुसरा; ऑस्ट्रेलियाचा नंबर पहिला

India's scenario for World Test Championship Final: भारतीय संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत विजय मिळवून  नंबर वन पटकावण्याच्या प्रयत्नात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 3:43 PM

Open in App

India's scenario for World Test Championship Final: भारतीय संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत विजय मिळवून  नंबर वन पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. अशात भारताने आज कसोटी क्रिकेटमधील नंबर वन स्थान नावावर केले होते, पण दोन तासांत हे अव्वल स्थान गेले. भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याआधी मिळालेल्या या गुड न्यूजमुळे भारतीय संघाचे मनोबल नक्की उंचावेल अशी आशा होती. भारतीय संघ ११५ रेटिंग पॉईंटसह अव्वल स्थानावर आला होता. ऑस्ट्रेलिया ( १११) व इंग्लंड ( १०६ ) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते.

आयसीसीने दोन तासांनंतर त्यांच्या वेबसाईटवरील चुक दुरूस्त केली अन् ऑस्ट्रेलिया १२६ पॉईंटसह अव्वल स्थानावर आला. भारत ११५ पॉईंटसह दुसऱ्या स्थानावर सरकला. 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-१ किंवा त्याहून अधिक विजय मिळवला तर अन्य मालिकांचा निकाल काहीही लागला तरी टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरेल. बांगलादेशविरुद्ध २-० अशी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या ५८.९३ % सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असे जिंकल्यास ६८.०६%, ३-१ असे जिंकल्यास ६२.५% आणि २-२ अशी बरोबरी राहिल्यास ५६.९४% होतील.

मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल्यास आणि श्रीलंकेने न्यूझीलंडमध्ये २-० ने विजय मिळवला तर भारत पहिल्या दोनमधून बाहेर पडेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ पेक्षा कमी गुण मिळवल्यास आणि दक्षिण आफ्रिकेने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध २-० असा विजय मिळवल्यास भारतीय संघ आफ्रिकेच्या मागेही घसरू शकतो. भारतीय संघाने २१ गुण कमावण्यात यश मिळवले, तर दक्षिण आफ्रिकेने मालिका १-० ने जिंकली किंवा २-२ (२४ गुण) बरोबरी केली तरते पुढे राहितली, परंतु १-१ बरोबरी (२० गुण) मिळवली तरीही ते पुढे नसतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App