India’s schedule for next WTC: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०१९-२०२१ च्या पर्वातील गुणतालिकेत भारतीय संघानं वर्चस्व गाजवले. अव्वल स्थानासह त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली, परंतु न्यूझीलंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. WTCच्या मालिकेत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी नमवून इतिहासात सुवर्णाक्षरानं नोंद केली. इंग्लंडविरुद्ध ०-१ असा पिछाडीवरून ३-१ असा विजय मिळवून अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. आता उपविजेत्या टीम इंडियाला ( India’s schedule for next WTC) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात आणखी खडतर आव्हानांचा सामना करावा लागणार आहेत. त्यात न्यूझीलंडचा पाहुणचार करण्याची संधी टीम इंडियाला मिळणार आहे. ( new WTC cycle that will be played from July 2021 to 2023. According to India’s 2021-23 Future Tour Programmes (FTP))
WTC Finalमधील पराभवानंतर विराट कोहलीनं BCCI विरोधात पुकारले बंड?; व्यक्त केली जाहीर नाराजी!
साऊदॅम्प्टन येथे झालेल्या WTC Finalमध्ये न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या डावात २४९ धावा केल्या. टीम इंडियाला दुसऱ्या डावात १७० धावाच करता आल्या अन् किवींनी १३९ धावांचे लक्ष्य सहज पार केले. केन विलियम्सननं ( ४९ व नाबाद ५२) व रॉस टेलर ( नाबाद ४७) यांच्यासह कायले जेमिन्सन, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, निल वॅगनर या गोलंदाजांनी विजयात खूप मोठा वाटा उचलला. आता WTC च्या दुसऱ्या पर्वासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. जुलै २०२१ ते २०२३ असा या दुसऱ्या पर्वाचा कालावधी असणार आहे.
आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!
भारताच्या २०२१ ते २०२३च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकानुसार विराट कोहली अँड टीम सहा कसोटी मालिका खेळणार आहेत. यापैकी तीन मालिका घरच्या मैदानावर, तर तीन परदेशात होतील. ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघ WTCच्या दुसऱ्या पर्वाच्या प्रवासाची सुरूवात करतील. ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारताचा इंग्लंड दौरा ( India tour of England, 2021) पहिली कसोटी - ४ ते ८ ऑगस्ट, ट्रेंट ब्रिजदुसरी कसोटी - १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स तिसरी कसोटी - २५ ते २९ ऑगस्ट, हेडिंग्लीचौथी कसोटी - २ ते ६ सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हलपाचवी कसोटी - १० ते १४ सप्टेंबर, ओल्ड ट्रेफर्ड
WTC Final मधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाला मिळणार आहे. न्यूझीलंड संघ नोव्हेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया तीन सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल. जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत ही मालिका होईल. त्यानंतर श्रीलंकेचा संघ तीन कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. २०२२च्या मध्यंतरात ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येईल आणि त्यांच्यात चार सामन्यांची मालिका होईल.