आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसरा एकदिवसीय सामना; मालिकेत कायम राहण्याचे आव्हान

कर्णधार विराट कोहली पुन्हा तिसऱ्या स्थानी खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 02:45 AM2020-01-17T02:45:26+5:302020-01-17T06:43:22+5:30

whatsapp join usJoin us
India's second ODI against Australia today; The challenge of staying in the series | आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसरा एकदिवसीय सामना; मालिकेत कायम राहण्याचे आव्हान

आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसरा एकदिवसीय सामना; मालिकेत कायम राहण्याचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजकोट : पहिल्या सामन्यात चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्याचा निर्णय फसल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे दुसºया एकदिवसीय सामन्यात पुन्हा तिसºया स्थानावर फलंदाजीला येईल. ऑस्ट्रेलियाने मुंबईतील पहिला सामना १० गड्यांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

मुंबईत डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरोन फिंच यांनी शतके झळकवली होती. फॉर्ममध्ये आलेले तिन्ही सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश ताहुल यांना संघात स्थान देण्याच्या नादात कोहली चौथ्या स्थानी खेळला आणि अपयशी ठरला होता. सलामीला खेळल्यानंतर धवनने आपण कुठल्याही स्थानावर खेळू शकतो, पण विराटने तिसºयाच स्थानावर फलंदाजी करावी, असे वक्तव्य केले होते.

रिषभ पंत बाहेर पडल्याने लोकेश राहुल हाच सामन्यात यष्टिरक्षण करेल, हे स्पष्ट आहे. मागच्या सामन्याप्रमाणे रोहितसोबत धवन डावाची सुरुवात करेल. चौथ्या स्थानासाठी राहुल किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होईल. पंतची जागा कर्नाटकचा मनीष पांडे घेऊ शकतो. अनुभवी केदार जाधव आणि युवा शिवम दुबे यांच्यापैकी कुणाची वर्णी लागेल हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. रोहित आणि श्रेयस अय्यर पहिल्या सामन्यात अपयशी ठरले होते. त्यांना या सामन्यात धावा काढाव्याच लागतील.जसप्रीत बुमराह वानखेडेवर अपयशी ठरला. त्याच्या सोबतीला येथे नवदीप सैनी व शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. रवींद्र जडेजाचे खेळणे निश्चित आहे. त्याच्या सोबत कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहल खेळेल.

ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. वॉर्नर व फिंचचा फॉर्म पाहता दुसºया सामन्यातही ऑस्ट्रेलिया भारतावर वर्चस्व गाजविण्याची संधी सोडणार नाही. पाहुण्यांची गोलंदाजीही तुल्यबळ असल्याने भारतीयांना जबाबदारीने खेळावे लागेल. 

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच(कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी, पॅट्रिक कमिन्स, एश्टन एगर, पीटर हॅँडस्कोम्ब, जोश हेजलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, एश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा.

Web Title: India's second ODI against Australia today; The challenge of staying in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.