Join us  

Video : ढोल ताशांचा गजर, लेकीची गळाभेट... असं झालं अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत

रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ  लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला...

By स्वदेश घाणेकर | Published: January 21, 2021 11:41 AM

Open in App

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभव ते गॅबा वरील ऐतिहासिक विजय... या चार कसोटी सामन्यांच्या प्रवासात टीम इंडियानं अनेक अशक्यप्राय खेळी करून दाखवल्या. ३६ ऑल आऊटनंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्वाची धुरा सांभाळताना मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून टीम इंडियाच्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर पुढील दोन कसोटींमध्ये जे घडले त्याचे आपण सर्वच साक्षीदार आहोतच... या ऐतिहासिक मालिका विजयानंतर अजिंक्य रहाणेमुंबईत परतला आणि त्याचे स्वागतही दणक्यात झाले...

रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ  लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला... ढोल ताशांच्या गजरात अजिंक्यचे स्वागत केले गेले. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत अजिंक्यनं त्याचे नेतृत्व कौशल्य जगाला दाखवून दिले. मेलबर्नवरील अविस्मरणीय शतक. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत चाललेली यादी पाहूनही तो डगमगला नाही, उलट नव्या दमाच्या सहकाऱ्यांना घेऊन कागांरूंशी भिडला.

आर अश्विन व हनुमा विहारी यांची झुंज.. रवींद्र जडेजाची प्रभावी गोलंदाजी.. मोहम्मद सिराजचा अफलातून मारा, शार्दूल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरची दमदार खेळी, चेतेश्वर पुजारानं रोवलेला नांगर आणि रिषभ पंतची तुफान फटकेबाजी... या सर्वांनी मिळून हा दौरा अश्विस्मरणीय केला.  या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी घोषणा करीत पाच कोटींचा बोनस जाहीर केला.    भारताने ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. गॅबा मैदानावर आतापर्यंत २५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आले नव्हते. १९५१ मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे २३६ धावांचे लक्ष्य गाठले होते. मात्र, भारतीय संघाने मंगळवारी ऐतिहासिक विजयासह वेस्ट इंडिजचा ७० वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. 

या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते की,'' ऑस्ट्रेलियाचा हा दौरा आतापर्यंतचा सर्वांत खडतर दौरा असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘हा सर्वांत खडतर दौरा होता. यापेक्षा सरस काहीच नाही. ३६ धावांत बाद झाल्यानंतर हे सर्व अवास्तविक भासत आहे. पराभव मानने आमच्या शब्दकोषात नाही.''

अजिंक्य म्हणाला होता की, ''आजचा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विजयाचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. संघातील सर्व खेळाडूंचा अभिमान वाटतो. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती. फलंदाजीसाठी उतरलो तेव्हाच जिंकण्यासाठी खेळायचे हे ठरवले होते. खेळपट्टीवर आम्ही सर्वस्व पणाला लावले. त्यामुळे हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला.'' 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेमुंबईरोहित शर्माचेतेश्वर पुजाराआर अश्विनरवींद्र जडेजामोहम्मद सिराजशार्दुल ठाकूरवॉशिंग्टन सुंदर