Join us  

Indian ODI Squad for SA Series : वन डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, शिखर धवनकडे नेतृत्व; वर्ल्ड कपसाठी निवडलेला खेळाडूही संघात

Indian ODI Squad for SA Series : भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. त्यासाठी आज बीसीसीआयने संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 6:23 PM

Open in App

Indian ODI Squad for SA Series : भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. त्यासाठी आज बीसीसीआयने संघ जाहीर केला. अनुभवी शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड अ विरुद्धच्या वन डे मालिकेत संजू सॅमसनने भारत अ संघाचे नेतृत्व करताना ३-० अशी मालिका जिंकली होती. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याच्याकडे उप कर्णधारपद सोपवण्यात येईल, अशी शक्यता होती. पण, १६ सदस्यीय संघाचे उप कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवले गेले आहे.

एअरपोर्टवर सिक्युरिटीने हटकले, पठ्ठ्याने २३,४०० रुपये मोजले; विराटसोबत सेल्फीसाठी असली शक्कल लढवली की...

 रवी बिश्नोई, मुकेश कुमार व रजत पाटीदार यांना वन डे संघात पदार्पणाची संधी मिळणार आहे. उम्रान मलिकचे नाव या यादीत नसल्याने तो  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी राखीव खेळाडू म्हणून जाईल हे निश्चित झालं आहे. शुबमन गिलने नुकतेच कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना शतक झळकावले होते आणि त्याचाही या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. इशान किशन व संजू हे दोन यष्टिरक्षक संघात आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी राखीव गटात असलेल्या दीपक चहरला मात्र या मालिकेत निवडले आहे. 

भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार),  श्रेयस अय्यर ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रजत पाटिदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर ( Shikhar Dhawan (C), Shreyas Iyer (VC), Ruturaj Gaikwad, Shubhman Gill, Rajat Patidar, Rahul Tripathi, Ishan Kishan (WK), Sanju Samson (WK), Shahbaz Ahmed, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Ravi Bishnoi, Mukesh Kumar, Avesh Khan, Mohd. Siraj, Deepak Chahar.) दक्षिण आफ्रिकेचा वन डे  संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स,  हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, एडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी.  

IND vs SA ODI Schedule:पहिली वन डे - ६ ऑक्टोबर, रांचीदुसरी वन डे - ९ ऑक्टोबर, लखनौतिसरी वन डे - ११ ऑक्टोबर, दिल्ली

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवनसंजू सॅमसनश्रेयस अय्यरदीपक चहर
Open in App