India’s squad for T20I series against Ireland: मोठी बातमी: हार्दिक पांड्या टीम इंडियाचा नवा कर्णधार

India’s squad for T20I series against Ireland हार्दिक पांड्या करणार भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 08:36 PM2022-06-15T20:36:44+5:302022-06-16T12:16:07+5:30

whatsapp join usJoin us
India’s squad for T20I series against Ireland announced, hardik pandya captain | India’s squad for T20I series against Ireland: मोठी बातमी: हार्दिक पांड्या टीम इंडियाचा नवा कर्णधार

India’s squad for T20I series against Ireland: मोठी बातमी: हार्दिक पांड्या टीम इंडियाचा नवा कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of Ireland - BCCI ने एका मालिकेतच भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार बदलला. सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिल्याने रिषभ पंत संघाचे नेतृत्व सांभाळत आहे. पण आता संघाच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या ( Hardik pandya) सांभाळणार आहे. आयर्लंडमध्ये होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी BCCI ने संघ जाहीर केला. 

VVS लक्ष्मण या दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक असणार आहे. २६ व २८ जूनला या लढती होणार आहेत. या कालावधीत भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि त्यामुळे आयर्लंडमध्ये खेळण्यासाठी वेगळी फळी मैदानावर उतरवली आहे. हार्दिक च्या नेतृत्वाखाली गुजरात टायटनने नुकतेच आयपीएल २०२२ चे जेतेपद पटकावले आहे. आयपीएल २०२२ मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. संजूचे पुनरागमन झाले आहे. 

भारतीय संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), भुवनेश्वर कुमार( उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उमरान मलिक. 

India Squad
Hardik Pandya (C), Bhuvneshwar Kumar (vc), Ishan Kishan, Ruturaj Gaikwad, Sanju Samson, Suryakumar Yadav, Venkatesh Iyer, Deepak Hooda, Rahul Tripathi, Dinesh Karthik (wk), Yuzvendra Chahal, Axar Patel, R Bishnoi, Harshal Patel, Avesh Khan, Arshdeep Singh, Umran Malik

 

Web Title: India’s squad for T20I series against Ireland announced, hardik pandya captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.