Indian Squad for SA T20I : हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन; रोहित, विराट, बुमराह यांना विश्रांती; BCCI ने जाहीर केला संघ

India vs South Africa T20I Series : आयपीएल २०२२नंतर भारतीय खेळाडू घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आफ्रिकेने आधीच संघ जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:35 PM2022-05-22T17:35:11+5:302022-05-22T18:04:08+5:30

whatsapp join usJoin us
India’s squad for T20I series against South Africa announced, KL RAHUL Captain of Indian T20I Squad, Dinesh Karthik, Hardik pandya comeback in squad | Indian Squad for SA T20I : हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन; रोहित, विराट, बुमराह यांना विश्रांती; BCCI ने जाहीर केला संघ

Indian Squad for SA T20I : हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन; रोहित, विराट, बुमराह यांना विश्रांती; BCCI ने जाहीर केला संघ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa T20I Series : आयपीएल २०२२नंतर भारतीय खेळाडू घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आफ्रिकेने आधीच संघ जाहीर केला आहे. ९ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी BCCI नेही संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेनुसार या मालिकेसाठी काही सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. आयपीएल २०२२मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही युवा खेळाडूंनाही BCCI ने संधी दिली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद लोकेश राहुल ( KL Rahul) कडे सोपवण्यात आले आहे. 

रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन्ही प्रमुख खेळाडू आयपीएल 2022मध्ये त्यांच्या फॉर्मशी झगडताना दिसले. रोहितने कालच्या सामन्यानंतर बीसीसीआयकडे विश्रांती मिळावी अशी विनंती केली होती आणि ती मान्य करण्यात आली. रोहित, विराट यांच्यासह जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात आलेली आहे. सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा व दीपक चहर हे दुखापतीतून सावरलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांची निवड झालेली नाही. आयपीएल 2022मध्ये पंजाब किंग्सचा अर्षदीप सिंग व  सनरायझर्स हैदराबादचा उम्रान मलिक यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळे त्यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादव व दीनेश कार्तिक याचे कमबॅक हे सुखावणारे आहे.

चेतेश्वर पुजाराचे कसोटी संघात पुनरागमन; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज

भारताचा संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक ( T20I Squad - KL Rahul (Capt), Ruturaj Gaikwad, Ishan Kishan, Deepak Hooda, Shreyas Iyer, Rishabh Pant(VC) (wk),Dinesh Karthik (wk), Hardik Pandya, Venkatesh Iyer, Y Chahal, Kuldeep Yadav, Axar Patel, R Bishnoi, Bhuvneshwar, Harshal Patel, Avesh Khan, Arshdeep Singh, Umran Malik) 

दक्षिण आफ्रिकेच्या संघात बदल...
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या २१ वर्षीय त्रिस्तान स्तुब्ब्स ( Tristan Stubbs) याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.  वर्षीय फलंदाजानं क्रिकेट दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० चॅलेंज्स स्पर्धेत जीबेट्स वॉरियर्स संघाकडून ४८.८३च्या सरासरीने व १८३.१२च्या स्ट्राईक रेटने २९३ धावा केल्या होत्या .जलदगती गोलंदाज एनरिच नॉर्खियाचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. डिसेंबर २०२१पासून तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. रिझा हेड्रीक्स व हेनरिच क्लासेन यांचेही पुनरागमन झाले आहे. २०१७ नंतर वेन पार्नेल कमबॅक करणार आहे.   

दक्षिण आफ्रिकेचा संध - टेम्बा वबुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेड्रीक्स, हेनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेज शम्सी, त्रिस्तान स्तुब्ब्स, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, मार्को येनसेन ( South Africa T20 squad vs India: Bavuma (C), De Kock, Reeza Hendricks, Heinrich Klaasen, Maharaj, Markram, Miller, Lungi Ngidi, Nortje, Parnell, Dwaine Pretorius, Rabada, Shamsi, Tristan Stubbs, Rassie van der Dusssen, Marco Jansen) 
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक

पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्ली
दुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटक
तिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाक
चौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोट
पाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू 
 

Web Title: India’s squad for T20I series against South Africa announced, KL RAHUL Captain of Indian T20I Squad, Dinesh Karthik, Hardik pandya comeback in squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.