India’s squad for T20I vs WI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच संघ निवड होती आणि अपेक्षेप्रमाणे सिनियर खेळाडूंना ट्वेंटी-२० संघात स्थान मिळालेले नाही. विराट कोहली, रोहित शर्मा यांना वर्क लोड मॅनेजमेंटच्या नावाखाली पुन्हा एकदा ट्वेंटी-२० संघातून बाहेर ठेवले गेले आहे.
- यशस्वी जैस्वाल व तिलक वर्मा यांना ट्वेंटी-२० संघात प्रथमच निवडले गेले आहे
- ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मा व रिंकू सिंग या आयपीएल २०२३ गाजवणाऱ्या खेळाडूंना वगळले गेले आहे.
- रवी बिश्नोईचे पुनरागमन झालेय, तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार यांच्यावर जलदगती माऱ्याची जबाबदारी सोपवली गेली आहे
- इशान किशन व संजू सॅमसन यांची यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून निवड केली गेलीय.
ट्वेंटी-२० मालिकापहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)