झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; शुबमन गिलकडे नेतृत्व, तर सीनियर खेळाडूंना विश्रांती

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 06:07 PM2024-06-24T18:07:37+5:302024-06-24T18:07:56+5:30

whatsapp join usJoin us
India’s squad for tour of Zimbabwe announced - Shubman Gill named the captain of the Indian team | झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; शुबमन गिलकडे नेतृत्व, तर सीनियर खेळाडूंना विश्रांती

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; शुबमन गिलकडे नेतृत्व, तर सीनियर खेळाडूंना विश्रांती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली.  टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill Captain) याला  झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाचा नवा कर्णधार बनवले गेले आहे.  दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या महत्त्वाच्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाणार नाही. यामध्ये विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे, ज्यांना विश्रांती दिली आहे.

भारतीय संघाला २०२४-२५ या वर्षात बरंच क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा खेळाडूंचा संघ निवडला गेला आहे. रियान पराग, अभिषेक शर्मा, नितिश कुमार रेड्डी व तुषार देशपांडे यांना झिम्बाब्वे दौऱ्यावर पदार्पणाची संधी मिळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये निवड झालेल्या पण बाकावर बसून राहिलेल्या संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, आवेश खान व शुबमन हे झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहेत.


 भारताचा संघ - शुबमन गिल ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे (  Ꮪhubman Gill (Captain), Yashasvi Jaiswal, Ruturaj Gaikwad, Abhishek Sharma, Rinku Singh, Sanju Samson (WK), Dhruv Jurel (WK), Nitish Reddy, Riyan Parag, Washington Sundar, Ravi Bishnoi, Avesh Khan, Khaleel Ahmed, Mukesh Kumar, Tushar Deshpande.) 


India vs Zimbabwe
पहिली ट्वेंटी-२० - ६ जुलै, हरारे
दुसरी ट्वेंटी-२० - ७ जुलै, हरारे
तिसरी ट्वेंटी-२० - १० जुलै, हरारे
चौथी ट्वेंटी-२० - १३ जुलै, हरारे
पाचवी ट्वेंटी-२०- १४ जुलै, हरारे
 

Web Title: India’s squad for tour of Zimbabwe announced - Shubman Gill named the captain of the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.