India’s squad for T20Is against New Zealand  announced - मोठी बातमी - रोहित शर्माकडे ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी, बीसीसीआयनं जाहीर केला संघ

India’s squad for T20Is against New Zealand announced - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व कोणाकडे जाईल याची सर्वांना उत्सुकता होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:50 PM2021-11-09T19:50:12+5:302021-11-09T20:04:31+5:30

whatsapp join usJoin us
India’s squad for T20Is against New Zealand  announced : Rohit Sharma appointed as the captain of the Indian team for the T20 format  | India’s squad for T20Is against New Zealand  announced - मोठी बातमी - रोहित शर्माकडे ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी, बीसीसीआयनं जाहीर केला संघ

India’s squad for T20Is against New Zealand  announced - मोठी बातमी - रोहित शर्माकडे ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी, बीसीसीआयनं जाहीर केला संघ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India’s squad for T20Is against New Zealand announced - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व कोणाकडे जाईल याची सर्वांना उत्सुकता होती. भारतीय संघ १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं आज संघ जाहीर केला आणि अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी निवड समितीनं १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.   

आज जाहीर करण्यात आलेल्या संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्थी, शार्दूल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला NCA मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला गेल्याचे समजते. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड, कोलकाता नाइट रायडर्सचा वेंकटेश अय्यर, दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा हर्षल पटेल यांना संधी मिळाली आहे. युजवेंद्र चहलचे कमबॅक झाले असून आर अश्विनचे स्थान कायम आहे. आयपीएल २०२१ त पर्पल कॅपचा मानकरी हर्षल पटेल यालाही संधी मिळाली आहे,  मोहम्मद सिराजही परतला आहे. 
 

भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज ( India’s T20I squad: Rohit Sharma (Captain), KL Rahul (Vice-Captain), Ruturaj Gaikwad, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wicket-keeper), Ishan Kishan (wicket-keeper), Venkatesh Iyer, Yuzvendra Chahal, R Ashwin, Axar Patel, Avesh Khan, Bhuvneshwar Kumar, Deepak Chahar, Harshal Patel, Mohd. Siraj) 


India vs New Zealand Schedule 2021

  •  पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१,  जयपूर
  •  दूसरा ट्वेंटी-२० -  १९  नोव्हेंबर, २०२१,  रांची
  • तिसरा ट्वेंटी-२० -  २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारत अ संघाचीही निवड केली गेली आहे. २३ नोव्हेंबरपासून हा दौरा सुरू होईल आणि भारत अ संघ येथे चार दिवसीय तीन सामने खेळेल. 

भारत अ संघ - प्रियांक पांचाळ ( कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू इस्वरन, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव, के गौथम, राहुल चहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उम्रान मलिक, इशन पोरेल, अर्झार नगवास्वाला ( India ‘A’ squad for South Africa tour: Priyank Panchal (Captain), Prithvi Shaw, Abhimanyu Easwaran, Devdutt Padikkal, Sarfaraz Khan, Baba Aparajith, Upendra Yadav (wicket-keeper), K Gowtham, Rahul Chahar, Saurabh Kumar, Navdeep Saini, Umran Malik, Ishan Porel, Arzan Nagwaswalla) 

Web Title: India’s squad for T20Is against New Zealand  announced : Rohit Sharma appointed as the captain of the Indian team for the T20 format 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.