India Tour To South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची अखेर घोषणा झाली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं बुधवारी संघ जाहीर केला. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व इशांत शर्मा यांच्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर मोठा निर्णय घेतला गेला. या तिघांनाही अखेरची संधी संघ व्यवस्थापनानं दिली आहे. अजिंक्यकडून उप कर्णधारपद काढून घेण्यात आले असून रोहित शर्मा आता टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार असणार आहे. भारत अ संघासोबत आफ्रिका दौऱ्यावर असेल्या हनुमा विहारीनं दमदार कामगिरी करून संघातील स्थान कायम राखले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करून मयांक अग्रवालनं त्याची जागा पक्की केली होतीच. श्रेयस अय्यरनं कानपूर कसोटीत पदार्पणातच शतक झळकावून निवड समितीचे मन जिंकले आणि त्यामुळे त्याला आफ्रिका दौऱ्यासाठी संघात कायम राखले गेले. रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , शुबमन गिल यांना दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावे लागले आहे.
भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज ( Squad: Virat Kohli (Capt),Rohit Sharma(vc), KL Rahul, Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Rishabh Pant(wk), Wriddhiman Saha(wk), R Ashwin, Jayant Yadav, Ishant Sharma, Mohd. Shami, Umesh Yadav, Jasprit Bumrah, Shardul Thakur, Md. Siraj.)राखीव - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला ( Standby Players: Navdeep Saini, Saurabh Kumar, Deepak Chahar, Arzan Nagwaswalla.)